आज संपुर्ण देशात हिंदुत्ववाद्यांचं राज्य, पण धर्माचं राज्य आहे काय ? संजय राऊतांची मोदी सरकारवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज देशात हिंदुत्वाच राज्य आहे, पण धर्माच राज्य आहे का, असा सवाल शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी रोखठोकमधून केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरे खुली करण्यावरून मुख्यमंत्र्यांना लिहलेले पत्र तसेच सुशांतसिंह रजपूत मृत्यू प्रकरण यासह विविध मुद्यांवरून खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. धर्माला जेंव्हा ग्लानी येते, तेंव्हा अधर्मचे प्राबल्य वाढत जाते. तेंव्हा मी अवतार धारण करतो, असे परमेश्वराने अभिवचन दिले आहे. पण हे अभिवचन या कलीयुगात खरे होणार का, असा सवाल उपस्थित केला आहे.

राऊत यांच्या लेखातील ठळक मुद्दे
ज्या राज्यात भाजपचे राज्य नाही. तेथे अधर्म सुरु असल्याचा प्रसार सुरु आहे. पं. बंगालमध्ये एका भाजप पदाधिक-याची हत्या झाली. त्या विरोधात हजारो कार्यकर्त्यांना जमवून कोलकत्यातील मंत्रालयावर चाल केली. यातून कायदा सुव्यवस्था निर्माण होऊल. त्याचा राजकीय फायदा विधानसभा निवडणूकीत होईल हे भाजपचे राजकीय धोरण असले तरी प. बंगाल हे हिंदुस्थानचाच भाग आहे हे केंद्र सरकारला विसरून चालणार नाही. भाजपला हवे असलेल्या धर्माचे राज्य आणण्यास जे विरोध करतील त्यांना लगलेच निपटून टाकायला हवे, असे काही प्रमुख नेत्यांना वाटते.

हे चांगल्या राज्यकर्त्यांना शोभत नाही
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार त्यांना खुपते व सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय त्यांना देशविरोधी वाटतो. एखाद्या राज्यात भाजप विरोधी सकरार स्थापन होणे हे काही घटना विरोधी नाही. पण ज्या ठिकाणी आपल्या विरोधातील सरकार आहे. त्या राज्यात पॉलिटिक्ल एजंट नेमायचा व राज्यपालाच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य अस्थिर करायचे,असे धोरण चांगल्या राज्यकर्त्यांना शोभत नाही.

मंदिर खुली करण्यावरून वातावरण तापल
महाराष्ट्रापेक्षा गंभीर प्रश्न गुजरात, हरीयाना आदी राज्यात आहेत. गुजरातमध्येही सोननाथ, अक्षऱधामसारखी मंदिरे बंद आहेत. पण महाराष्ट्रात मंदिरे बंद म्हणून राज्यपालांनी खोडसाळपणे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले. शेवटी राज्याच्या मुुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत. याचा विसर त्यांना पडला अन महाभारत घडले. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेत अडसर ठरलेले शरद पवारापासून संजय राऊत यांच्या पर्यंत सगळ्यांना निपट डालो असा अजेंडा राबवायचा. सुशांत प्रकरणात सेनेच्या युवा नेत्यांना निपटण्याचे त्यांचे प्रयत्न त्यांच्यावरच उलटले. सीबीआय,इडी, इन्कम टॅक्स आदीचा वापर करायचा, हे तर रशिया चीनपेक्षा भयंकर आहे.

केंद्राची भूमिका असावी
पं. बंगालमध्ये राज्यपाल धनखर हे रोज नवी आघाडी उभारत आहेत. ममता बॅनर्जी लढाईत मागे हटत नाही.दिल्लीत देखील केजरीवाल विरुध्द राज्यापाल संघर्ष सुरु आहे. महाराष्ट्रात राज्यपालांनी प्रयत्न करूनही ठाकरे सरकार स्थिर आहे. पंजाबमध्ये लढवय्या शीख समाज उसळला तर गडबड होईल म्हणून तेथे कोणी हिंमत करत नाही.