Sanjay Raut On Sambhajiraje Chhatrapati | ‘संभाजीराजे छत्रपतींच्या उमेदवारीचा विषय आमच्या दृष्टीनं संपलाय’ – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut On Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजे छत्रपतींच्या उमेदवारीचा (Sambhajiraje Chhatrapati) विषय आमच्या दृष्टीनं संपलेला आहे, असं मत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले आहे. ‘शिवसेनेच्या एका जागेवर उमेदवारी हवी असेल तर संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी भूमिका पक्षाकडून घेण्यात आली होती. मात्र संभाजीराजेंनी त्यास अप्रत्यक्षपणे नकार दिला. त्यामुळे शिवसेनेने कोल्हापुरातल्याच दुसऱ्या नेत्याला उमेदवार म्हणून घोषित केलं.’ असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, ”आमच्याकडून संभाजीराजेंचा विषय संपला आहे. मराठा संघटना संजय राऊत आणि शिवसेनेला हे महागात पडेल अशा धमक्या देत आहे. पण संजय राऊतांचा या गोष्टींशी व्यक्तिगत संबंध काय ? शिवसेनेचा तरी काय संबंध ? जे अशा धमक्या देत आहेत, त्यांनी मागच्या काही दिवसांतल्या घडामोडींचा अभ्यास करावा,” त्याचबरोबर ‘आम्ही 42 मतांचा कोटा संभाजीराजेंना द्यायला तयार होतो, असंही संजय राऊत  म्हणाले. तसेच, संभाजीराजेंनी शिवसेनेचे उमेदवार व्हावं एवढीच आमची अपेक्षा होती, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : shiv sena mp sanjay raut on sambhajiraje chhatrapati over rajya sabha election 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त