‘कोशीश करने वालों की कभी हार नही होती’ ! संजय राऊतांचा रूग्णालयातून ‘आशावाद’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेची बाजू गेली काही दिवस लावून धरणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर सोमवारी रात्री अ‍ँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी एक ट्विट करुन शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असा आशावाद संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत दररोज सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाबाबत आक्रमक असलेल्या शिवसेनेची बाजू माध्यमांमध्ये ठामपणे मांडत होते. मात्र, आज ते रुग्णालयात असल्याने त्यांनी ट्विट करुन पुन्हा एकदा सत्ता स्थापनेच्या प्रयत्नात शिवसेना मागे हटली नाही, असा विश्वास निर्माण केला आहे.

लहरों से डर कर नौका पार नही होती,
कोशीश करने वालों की कभी हार नही होती !
बच्चन.
हम होंगे कामयाब
जरुर होंगे….
असे ट्विट त्यांनी केला आहे.

शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आवश्यक पाठबळ उभे करण्यासाठी मागितलेली मुदत राज्यपालांनी नाकारली असली तरी अजून प्रयत्न संपलेले नाहीत. अजूनही शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

Visit : Policenama.com 

You might also like