‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ वरून संजय राऊतांचा सवाल, म्हणाले – ‘हे उदयनराजे, शिवेंद्रराजे, छत्रपती संभाजीराजेंना मान्य आहे का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. हा वाद उसळण्याचे कारण म्हणजे दिल्लीच्या भाजपाच्या कार्यालयात ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना ही शिवाजी महाराजांशी करण्यात येत आहे. हे चुकीचे आहे असे मत सोशल मीडियावर व्यक्त केले जात आहे. या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी देखील जनतेने केली आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी भाजपाचे दिल्लीचे अध्यक्ष मनोज तिवारींसह भाजपाचे अनेक नेते उपस्थित होते. हे पुस्तक जय भगवान गोयल यांनी लिहिलं आहे.

दरम्यान भाजपानं प्रकाशित केलेलं ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक चांगलंच वादात सापडलं असून छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही, अशा शब्दांत काँग्रेस, राष्ट्रवादीनं भाजपाला लक्ष्य केलं आहे. यानंतर आता शिवसेनेचे संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली असून त्यांनी म्हटले की, शिवरायांच्या वारसांना महाराजांची मोदींबरोबर करण्यात आलेली तुलना मान्य आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तसेच संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी असे महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महाशय कोण आहेत ? हेच ते जयभगवान गोयल. यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला व मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा!!!’, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. ‘जय भगवान गोयल आधी शिवसेनेत होते. महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली,’ शिवाजी महाराजाचा एकेरीत ऊल्लेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का? असं देखील संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.

संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांची तुलना या पुस्तकातून करण्यात आल्याने भाजपाला धारेवर धरले आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांना आणि भाजपातील शिवाजी महाराजांचे वंशजांना प्रश्न केलाय की त्यांनी या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट करावी. राऊत म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही कुणाशीच होऊ शकत नाहीत. जसे एक सूर्य, एक चंद्र, तसेच एक छत्रपती शिवाजी महाराज. अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडत भाजपाला लक्ष केलं.

तसेच शिवाजी महाराजांच्या वंशजांना हे मान्य आहे का असा प्रश्न देखील उपस्थित केला. ‘शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करून जय भगवान गोयल महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मोदींबरोबर केली हे भाजपात गेलेल्या छत्रपतींच्या वंशजांना हे मान्य आहे का ? सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयनराजे, श्रीमंत शिवेंद्रराजे, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना हे मान्य आहे का ? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. असे ट्विट देखील त्यांनी सोशल मीडियावर केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/