…म्हणून प्रताप सरनाईक एवढे हतबल झाले; खा. संजय राऊत यांनी सांगितले

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Saranaik) यांनी भाजपसोबत युती करावी अशी थेट मागणीच पत्राद्वारे शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांच्याकडे केली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आमदार सरनाईकांच्या या पत्राचा धागा पकडत शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी ईडी, सीबीआयच्या (ED, CBI) गैरवापरावरून केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य केले आहे.

shiv sena mp sanjay raut slams central government misusing agencies bats pratap sarnaik

केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कधीकाळी नरेंद्र मोदी, अमित शहांनादेखील त्रास सहन करावा लागला. त्यामुळे यंत्रणांमुळे होणाऱ्या मनस्तापाची त्यांना कल्पना असेल असे राऊतांनी सामनातील रोखठोक सदरात म्हटले आहे. सरनाईकांना सुरुवातीला ईडीचे समन्स आले तेव्हा भाजप व ईडीच्या अन्यायाशी शेवटपर्यंत लढेन असे त्यांनी सांगितले. अर्णब गोस्वामीविरुद्ध हक्कभंग आणून खळबळ माजवणारे सरनाईक असे हतबल का झाले? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागे ईडी (ED) हात धूऊन लागले आहे. त्यामुळे सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महाविकास आघाडी स्थापन करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्याने माझ्यासारख्यांना विनाकारण त्रास देणे सुरु आहे. उद्धवजी, या विनाकारण त्रासातून मुक्ती हवी असेल तर केंद्रातील मोदींशी जुळवून घ्या, असे सरनाईकांनी पत्रात म्हटले आहे. सरनाईकांचा त्रागा मुख्यमंत्र्यांना असे टोकाचे पत्र लिहिण्यापर्यंत का गेला?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

माझ्याबरोबर माझ्या कुटुंबियांचाही छळ सुरू असून तो थांबवा असे त्यांचे म्हणणे आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा छळवाद राज्य सरकार थांबवू शकत नाहीत, हे लोकशाहीतले मोठे दुर्दैव. ईडीच्या कार्यालयातून बोलावले जाते अन् मूळ विषय बाजूला ठेवत ज्याचा मूळ गुन्हय़ाशी संबंध नाही असे प्रश्न विचारले जाते. हा दबाव टाकण्याचाच प्रकार आहे. हे सर्व आता सरनाईकांनी हायकोर्टात याचिका दाखल करून सांगितले. सरनाईक व त्यांच्यासारख्या अनेकांचे हेच म्हणणे असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींची ही कैफियत पंतप्रधानांकडे मांडावी असे राऊतांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा

2 ड्रोनच्या सहाय्याने जम्मू विमानतळावर बॉम्बहल्ला ! व्हाईस एअर चीफ मार्शल एच. एस. अरोरा जम्मूला रवाना

पहिल्यांदाच शनिवार, रविवारी लागोपाठ पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

MPDA Act | पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून 3 सराईतांवर MPDA कायद्यान्वये कारवाई, सराईतांची रवानगी जेलमध्ये

List of 30 Animal Virus | 887 धोकादायक व्हायरसची यादी झाली तयार; 30 आणू शकतात भविष्यात ‘महामारी’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : MLA Pratap Saranaik | shiv sena mp sanjay raut slams central government misusing agencies bats pratap sarnaik

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update