शिवसेनेच्या खासदारांना देखील वाटतं भाजपसोबत सरकार स्थापन व्हावं, ‘या’ केंद्रीय मंत्र्यानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिवसेनेचे भाजपशी बिनसल्याचे दिसत असताना युती साबूत राहावी यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंकडून प्रयत्न होताना दिसत आहेत. यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की मी शिवसेनेच्या काही खासदारांशी चर्चा केली आहे. त्यांनी देखील वाटते की राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन व्हावे. त्यासाठी 3 – 2 वर्षांचा फॉर्म्युला असावा असे मला वाटते.

राज्यात निवडणूकीचा धूराळा शमला. निकाल लागले. महिना होत आला तरी सत्तास्थापनेवर तोडगा निघाला नाही. एकीकडे भाजप शिवसेना संबंध ताणालेले असताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक नवा फॉर्म्युला शोधून काढला आहे. त्यांच्या या फॉर्म्युल्याला मूर्त रुप येणार का हे अजून स्पष्ट नाही. परंतू या फॉर्म्युल्या नुसार मुख्यमंत्रिपदावरुन निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी 3 वर्षाचे मुख्यमंत्रिपद भाजपकडे आणि उर्वरित 2 वर्षांचे मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे देण्यात यावे.

ते म्हणाले की, या फॉर्म्युल्यावर मी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. तीन – दोनचा फॉर्म्युला भाजपला मान्य आहे का हे आधी स्पष्ट झाले पाहिजे असे संजय राऊत म्हणाले. सेनेच्या बऱ्याच खासदारांशी मी बोललो. या फॉर्म्युल्यावर भाजपची मान्यता असेल तर आमचा पक्ष याला सहमती देईल असे ही मत खासदारांनी व्यक्त केले. तसेच आठवले यांनी दावा केला की खासदार श्रीकांत शिंदे, खासदार राहुल शेवाळे, खासदार बारणे यांच्यासह 5 – 6 खासदारांशी या मुद्यावर चर्चा झाल्या.

आठवले म्हणाले की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी देखील या फॉर्म्युलावर चर्चा झाली आहे. भाजपच्या वरिष्ठ पातळीवर होणाऱ्या निर्णयावर प्रदेश भाजप बांधिल असल्याचे पाटील यांचे मत असल्याचे आठवले यांनी सांगितले.

तिढा लवकरच सुटेल
आठवले म्हणाले की, शाहांनी महाराष्ट्रातील तिढा लवकरच सुटेल असा विश्वास व्यक्त केला आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या बैठकीत अमित शाह यांच्याशी आठवले यांनी चर्चा केली. राज्यातील तिढा लवकर सोडवा अशी विनंती शाह यांना केल्याचे आठवले म्हणाले. चिंता करु नका, सर्व काही ठीक होईल असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केल्याचे आठवले म्हणाले.

Visit : Policenama.com