शिवसेना खासदाराच्या गाडीनं ‘हरिणाला’ चिरडले, चालक ताब्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे खासदाराच्या गाडीने बुधवारी हरिणाला चिरडले. शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या एसयूव्ही चारचाकी वाहनाने बुधवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एका हरिणाला चिरडले. एसजीएनपीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गावित यांच्या नावे नोंदवलेल्या एसयूव्ही कारने एसजीएनपी आत त्रिमूर्ती स्टेशनलगतचा रस्ता ओलांडणाऱ्या हरिणाला गाडीखाली चिरडल्याचा प्रकार घडला.

मुख्य वनसंरक्षक आणि एसजीएनपीचे संचालक अन्वर अहमद म्हणाले की बेजबाबदारपणे वाहन चालविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसजीएनपीच्या सूत्रांनी सांगितले की ही घटना सायंकाळी 6 ते 6:30 वाजताच्या सुमारास घडली. एसटीएनपी मुख्य गेटकडे कार जात असताना गांधी टेकडीजवळ हरिण गाडीखाली आले. चालकाने आम्हाला अपघाताची माहिती मुख्य प्रवेशद्वारापाशी दिली. तेव्हा जखमी हरिणाला तातडीने एसजीएनपी पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. हे वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.

अन्वर अहमद म्हणाले की आम्ही वाहन चालकांना आव्हान करु इच्छितो की वाहन चालकांनी एसजीएनपीमध्ये कायद्याचे पालन करावे. पर्यटकांमध्ये आम्ही जागरुकता निर्माण करत आहोत. लवकरच ही मोहिम राबवण्याचा विचार आम्ही करत आहोत.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like