उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वप्रथम घेणार ‘हा’ महत्वाचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उद्या शिवतीर्थावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्यात आधी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकारने दिलेली रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये वापरली जाऊ शकते.

शिवसेनेच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मुद्दा होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्यात आधी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय होऊ शकतो. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टचे पैसे शेतकऱ्यांसाठी वळवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्य सरकार या प्रकल्पासाठी 25 टक्के हिस्सा देणार आहे. त्यापोटी 5000 कोटी रुपये द्यावे लागतील. हेच पैसे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी वापरले जातील अशी चर्चा आहे.

महिन्याभराच्या राजकीय नाट्यानंतर अखेर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यानं नवं सरकार स्थापन झालं. परंतु तीनच दिवसांमध्ये हे सरकार कोसळलं. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत महाविकासआघाडीचं सरकार आणण्याच्या तयारीत आहे.

Visit : Policenama.com