शेतकऱ्यांच्या अजेंड्यावर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस काम करणार, सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शेतकऱ्यांचा अजेंडा समोर ठेवून शिवसेना-राष्ट्रवादी काम करणार असल्याचे शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत ठरल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत हा अजेंडा निश्चित करण्यात आला आहे. या अजेंड्यावर लक्ष ठेवून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस काम करणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल असल्याचे दिसते आहे.

मुंबई आणि दिल्लीत सत्तास्थापनेवरुन बैठकांचे सत्र सुरु आहे. राज्यपालांकडून शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनेकडे आता काही तास शिल्लक आहे. असे असताना राज्यात महाशिवआघाडी सत्ता स्थापन करणार का या चर्चांना आणि राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईत नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान दिल्लीत देखील काँग्रेस नेत्यांची बैठक सुरु आहे. काँग्रेस हायकमांड मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्यात उत्सुक नसल्याचे वृत्त होते. असे असले तरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेते शिवसेनेला पाठिंबा देण्यावर ठाम आहेत. परंतू बऱ्याच बाबी दिल्लीतील बैठकीवर आधारित आहे.

शेतकऱ्यांच्या अजेंड्यावर काम करण्याचे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवण्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे. यानंतर राज्यातील जनतेला पडलेले कोडे सुटेल अशी शक्यता आहे.

Visit : Policenama.com