शिवसेनेकडून तब्बल 2 कोटींची ‘ऑफर’, आदित्य ठाकरेंच्या विरोधातील उमेदवार थेट पोलिस ठाण्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने गौतम गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. गायकवाड यांनी माघार घेण्यासाठी शिवसेनेकडून दोन कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप केला असून त्यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांकडून त्यांना सुरक्षेसाठी एक पोलीसही देण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीने वरळी विधानसभा मतदारसंघातून गौतम गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली असून गायवाड हे माजी पोलीस अधिकारी आहेत. गायकवाड यांना माघार घेण्यासाठी एकनाथ शिंदे या ठाण्यातील व्यक्तीने कॉल करून दोन कोटी रुपयांची ऑफर दिली. उमेदवारी अर्ज भरल्यापासून त्यांना शिवसेनेकडून कॉल सुरु झाले. गुरुवारी आनंद दिघे यांच्या विश्वासू आणि जवळच्या कार्यकर्त्यांनी त्यांची दादर परिसरात भेट घेत त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी दोन कोटींची ऑफर दिली. तसेच ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उभा असलेल्या वंचितच्या उमेदवाराला 25 लाख देणार असल्याचे सांगत दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार गायकवाड यांनी अप्पर पोलीस आयुक्तांकडे लेखी स्वरुपात केली आहे.

गौतम गायकवाड यांनी कोणी कॉल केले आहेत याचा शोध घेण्याची विनंती पोलिसांना केली आहे. त्यानुसार वरळी पोलीस तपास करत असून गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून कॉल करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये युवा सेना प्रमुख उद्धव ठाकरे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे वंचितने माजी पोलीस अधिकाऱ्याला उमेदवारी देऊन ठाकरे यांच्या विरोधात आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, गायकवाड यांनी आपल्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे सांगितले. तसेच मनसे सह सर्व पक्षांनी आपले उमेदवार उभे केले नाहीत. त्यामुळे शिवसेनेकडून मला उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या