…म्हणून शिवसेनेचे पदाधिकारी भारावले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला बघण्याचा योग काल सायंकाळी पश्चिम लोकसभा मतदारसंघातील अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रथमच मिळाला. हा योग्य थोड्यांनाच मिळतो. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ट्राफिक मध्ये अडकते जायला नको म्हणून शिवसेनेच्या पदाधिकारी लवकर निघून वेळेत वर्षा बंगल्यावर पोहोचले.

यावेळी, गरम गरम चहा, नाष्टा उपमा आणि लाडू असा चविष्ट आस्वाद घेत मुख्यमंत्र्यांच्या पाहुणचारामुळे शिवसैनिक भारावून गेले. अनेक पदाधिकाऱ्यांनी वर्षा बंगल्याच्या आठवणी टिपण्यासाठी त्यांच्या मोबाईलच्या कॅमेर्‍यातून फोटो काढले. ते सोशल मीडियावर शेअर देखील केले.

आगामी पालिका निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा प्राथमिक तयारीसाठी उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना वर्षावर बोलवण्यात आले होते.

गेल्या शनिवारपासून स्वतः मुख्यमंत्री हे मुंबई शहर व उपनगरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत होते आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंधेरी (पश्चिम) अंधेरी पूर्व वर्सोवा या तीन विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी प्रथम संवाद साधला. त्यानंतर जोगेश्वरी पूर्व दिंडोशी व गोरेगाव येथील विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तर आज सायंकाळी विभाग क्रमांक १मधील दहिसर बोरीवली व मागाठाणे येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, की “माझ्या शिवसैनिकांमुळे मी मुख्यमंत्री झालो, त्यामुळे तुम्हाला आज वर्षा बंगल्यावर बोलवलं. कोविड मुळे थोड्याच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावर बोलवलं. मात्र कोविड गेल्यावर सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावर बोलविण्यात येईल. मुंबई महानगर पालिकेवर भगवा फडकवण्यासाठी मिशन २०२२ लक्षात ठेवा. विरोधकांनी टीका केली तर लक्ष देऊ नका. आपले काम करत जा . महापालिकेचे राज्य सरकारच्या स्तरावर प्रश्न आपले विभाग प्रमुख व आमदारांच्यामार्फत मांडा ते निश्चित सोडवले जातील.”

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण ही शिकवण शिवसैनिकांना दिली. आज शिवसेनेच्या २२७ शाखा एक कान व डोळे आहेत. बारा पुरुष व महिला विभाग प्रमुख, विधानसभा संघटक, विधानसभा समन्वयक, उपविभागप्रमुख, २२७ शाखाप्रमुख व सुमारे १०००० गटप्रमुख कसा मोठा शिवसैनिकाचा ताफा शिवसेनेकडे आहे . तर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची युवासेना सुद्धा जोमाने काम करत आहे. अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवत आहे.

शिवसेना नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांच्या लोक आधिकारी समितीचे कार्यदेखील जोमाने सुरू आहे. भारतीय कामगार सेनेच्या आधिपत्याखाली मोठा कामगार वर्ग त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईवर भगवा फडकविण्यासाठी शिवसेना सज्ज झाल्याचं चित्र आहे.

यावेळी उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई परिवहनमंत्री व विभाग प्रमुख ॲड. अनिल परब, खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, सेनेचे प्रवक्ते विभाग प्रमुख व आमदार सुनील प्रभू, माजी राज्यमंत्री व आमदार रवींद्र वायकर आदी उपस्थित होते.