‘अक्कलकुवा’ शहरात शिवसेनेचे कार्यालय जाळले, परिसरात ‘तणाव’, ‘जमाव’बंदी लागू

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाईन – अक्कलकुवा शहरात काही अज्ञातांनी शिवसेनेचं कार्यालय जाळल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (दि 8 जानेवारी) रात्री ही घटना घडली. काही अज्ञातांनी महामार्गावरील शिवसेनेचे कार्यालय जाळलं आहे. या घटनेनंतर अक्कलकुवा शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. जिल्हा परिषद निकालावरून ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बुधवारी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत एका गटात काँग्रेसला तर दुसऱ्या गटात भाजपला बहुमत मिळालं आहे. या निकालावरून कार्यालय जाळल्याची घटना घडली असावी असा अंदाज आहे. याशिवाय अशी माहिती आहे की, अक्कलकुवा शहरात भाजप आणि शिवसेनेत जुना वाद आहे. यावरून ही घटना घडल्याची शक्यता समोर येताना दिसते.

शिवसेना कार्यालय जाळ्याची घटना कळताच शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यालयाबाहेर जमा झाले. यानंतर दोषींना तात्काळ अटक करण्याची त्यांनी मागणी केली. यासाठी अक्कलकुवा शहराच्या पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले आहेत. आज (गुरुवार दि 9 जानेवारी) कार्यालय जाळल्याची घटना समोर आली.

या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या घटनेनंतर शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. शहरातील बाजापेठांसह सर्वच ठिकाणी शुकशुकाट दिसत आहे. पोलिसांनी सर्व नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/