‘भगव्यात नाही, तर काँग्रेसच्या रंगात रंगलीय शिवसेना’, गडकरींची शिवसेनेवर ‘जहरी’ टीका

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – ‘शिवसेना केवळ भगवा रंग असल्याचे भासवते, मात्र खरं तर ती काँग्रेसच्या रंगात रंगली आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेवर केली आहे. नागपूर येथे जिल्हापरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका प्रचारसभेवेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.

‘शिवसेनेने त्यांच्या विचारधारेशी प्रतारणा केली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी ही भूमिका घेतली आणि केवळ सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले, असा आरोपही गडकरी यांनी यावेळी केला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सलग दोन महिने रंगलेल्या सत्तानात्यानंतर आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील शिवसेनेवर हल्ला चढविला. ‘शिवसेनेकडे खडसेंना देण्यासाठी आहे तरी काय, कोल्हापूरमध्ये शिवसेना विरोधकांना जाऊन मिळाल्याने भाजपाला अपयश आले. आम्हाला हरवण्यासाठी या सर्वांना एकत्र यावे लागले, सोलापूर, सांगलीत आम्ही आलो हे लक्षात असू द्यावे, असे देखील त्यांनी यावेळी म्हंटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/