बाळासाहेबांच्या 7 व्या स्मृतीदिनी शिवसेना ‘NDA’तून बाहेर, भाजपनं केली अधिकृत घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना- भाजप महायुतीला बहुमत मिळाले असता नाही दोन्ही पक्षामध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण झाले. त्यातच केद्रातील शिवसेनेच्या मंत्र्याने राजीनामा दिल्याने शिवसेना एनडीएतून बाहेर पडण्याचे संकेत मिळाले होते. अखेर शिवसेना  एनडीए मधून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा भाजपने केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे खासदार विरोधी बाकावर बसणार आहेत. शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याचे केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रातील सत्ता समीकरणामुळं ताणलेल्या संबंधामुळं अखेर युती तुटीली. शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची घोषणा भाजपाकडूनच करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. प्रल्हाद जोशी म्हणाले की, शिवसेनेच्या मंत्र्यांने राजीनामा दिला आहे. एनडीएच्या ते बैठकीलाही आले नाहीत. त्यांच्यासाठी विरोधी बाकांवर बसण्याची सोय केली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एनडीएने आयोजित केलेल्या घटक पक्षांच्या बैठकीला शिवसेना जाणार नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यातच आजच्या बैठकीला शिवसेनेच्या खासदरांनी दांडी मारल्याने शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याचे भाजपकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.

शिवसेनेचे मंत्री अरविंद सावंत यांनी केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना एकप्रकारे एनडीएतून बाहेर पडणार असल्याचे संकेत होते. मात्र, आज भाजपने अधिकृत घोषणा केल्याने एनडीएचा दोन नंबरचा मित्र पक्ष असलेल्या शिवेसनेच्या खासदारांना आता विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. लोकसभा निवडणुक एकत्र लढवल्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही पक्षामध्ये तेढ निर्माण झाली होती. अखेर आज भाजपने युती तुटल्याचे जाहीर केले. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार पुन्हा येणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like