अरे नालायका, मग मी कोणाला मत देऊ ? : उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – यांना मतदान देऊ नका, त्यांना मतदान देऊ नका असे जे तुम्हाला सांगत आहे त्यांना विचार. अरे नालायका मी कोणाला मत देऊ ? अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली आहे. नाशिक येथील जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.

नाशिक लोकसभा मतदार संघाचे युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यावेळी काँग्रेस युतीला संपवण्यासाठी निवडणूक लढवत आहे. औरंगजेबाच्या थडग्यावर डोके टेकले होते तो ओवैसी तुम्हाला चालणार आहेत का ? असा सवालही त्यांनी केला. तसेच ओवैसीचा पक्ष हा निजामाला पाठिंबा देण्यासाठी उदयास आला. एक औरंगजेब आम्हालासुद्धा जवळचा वाटतो. पण तो औरंगजेब नावाचा एक सैनिक परत होता. तो मुसलमान होता पण देशासाठी लढत होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली. जो या देशाला आपला देश मानतो तो धर्माने कोणताही असो तो आमचा आहे. असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, तुम्ही याला मत देऊ नका त्यांना मत देऊ नका असं जे तुम्हाला सांगत आहे ना त्यांना विचारा अरे नालायका मग मी कोणाला मत देऊ. असे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचे नाव न घेता म्हंटले आहे.