पेट्रोल दरवाढ विरोधात शिवसेनेची सायकल रॅली

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन 

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेच्या वतीने आज पेट्रोल दर वाढीच्या विरोधात सायकल रॅली काढण्यात आली, रॅलीला मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. मोरवाडी ते पिंपरी आंबेडकर चौका पर्यंत सायकल रॅली काढण्यात आली.जय भवानी जय शिवाजी,भाजपा मुर्दाबाद,बहुत हुई महेंगाई की मार कहा गयी मोदी सरकार अश्या घोषणा देण्यात आल्या.यावेळी खासदार श्रीरंग बारणे,आमदार गौतम चाबुकस्वार,शहराध्यक्ष योगेश बाबर,सुलभा उबाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून भाजपा सरकार हे पेट्रोलचे दर आवाक्यात ठेवण्यास अपयशी ठरत आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस पक्ष,मनसे आणि आता सत्तेत भागीदारी असलेल्या शिवसेना पक्षाने देखील भाजपा सरकारच्या पेट्रोल महागाई विरोधात रस्त्यावर उतरली असून पिंपरी-चिंचवड शहरात सायकल रॅली काढण्यात आली.यावेळी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक सायकल रॅलीत सहभाग झाले होते.परंतु आज चक्क एक पैश्यांनी पेट्रोल स्वस्त झाले असून भाजपा कडून नागरिकांची थट्टाच केली आहे असच म्हणावं लागेल.परंतु पेट्रोल दरवाढवर ठोस पाऊल भाजपाने उचलावीत अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.