शिवसेनेचा ‘वचन’नामा जाहीर, दिली ‘ही’ 10 प्रमुख वचनं, जाणून घ्या

मुंबई  पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन मातोश्रीवरून शिवसेनेने आपला वचननामा प्रकाशित केला आहे. यामध्ये अनेक आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्यात युती असूनदेखील शिवसेना आणि भाजपचा वेगवेगळा वचननामा प्रकाशित होणार आहे. येत्या १५ ऑक्टोबरला भाजप सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपले संकल्प पत्र जाहीर करणार आहे.

शेतकऱ्यांची कर्जमाफी, कोकणविकास प्राधिकरणची स्थापना, बचत गटांना सहकार्य तसेच आरेचा प्रश्न अशा प्रकारही अणे आश्वासने या वचननाम्यात देण्यात आलेली आहेत.

शिवसेनेच्या वचननाम्यातील महत्वाचे मुद्दे –

1. वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना.
2. विद्यार्थ्यांना वाहतुकीत विशेष सवलत.
3. महिला सक्षमीकरणावर भर.
4. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा दर्जेदार करण्यासाठी योजना
5. कृषी उत्त्पन्न आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर विविध योजना
6. शहरांच्या विकासासाठी विशेष योजना
7. फक्त 10 रुपयांत जेवणाची थाळी.
8. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात विशेष योजना
9. रोजगार उत्पन्नासाठी विशेष योजना
10. उद्योग व्यापारासाठी विशेष योजना

युतीला अनेक ठिकाणी बंडघोरांना सामोरे जावे लागत आहे. तिकीट न मिळाल्यामुळे सेना आणि भाजप यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यातच भाजपच्या जिल्हा अध्यक्षांनी आता थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

कणकवली हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येऊन सुद्धा उद्धव ठाकरेंनी नितेश राणे यांच्याविरोधात आपला उमेदवार दिल्याने भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सोलापूर, कोकणातील कुडाळ, सावंतवाडी, गुहागर यासह विदर्भ आणि मराठवाड्यातीलही अनेक जागांवर युतीतील नाराज नेत्यांनी बंडखोरी केली आहे. आता या बंडखोरीचा कितपत परिणाम युतीतील उमेदवारांवर होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Visit : Policenama.com