भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांनी शिवसेनेला मारला एकदम ‘कडक’ टोला, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेचा पेच सुटत असतानाचे दिसत नाही. अशात भाजप देखील वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेनेवर टीकास्त्र डागले.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की पाठिंबा मिळत असल्याचा आव आणला तरी असमर्थ ठरले अशी टीका शिवसेनेवर केली. काही लोकांच्या हट्टामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

राष्ट्रपती राजवट लागू होण्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणं हा जनतेचा अपमान आहे, काही लोकांच्या हट्टामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यातील राजकीय घडमोडींवर भाजपचे लक्ष आहे. परंतू भाजप अजूनही वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे.

राज्याला स्थिर सरकारची गरज आहे. राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे, शेतकरी संकटात असल्याने राज्याला स्थिर सरकारची आवश्यकता आहे. परंतू भाजप शेतकऱ्यांच्या पूर्णता पाठिशी आहे. भाजप शेतकऱ्यांसाठी उभा आहे. योग्य वेळी भाजप आपली भूमिका स्पष्ट करेल.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like