शेतकर्‍यांना भाजपसमर्थक मोदीभक्त ‘नटी’ने दहशतवादी ठरवले : शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हक्कांसाठी लढणारे शेतकरी ‘आतंकवादी’ किंवा ‘दहशतवादी’ आहेत असे म्हणत अभिनेत्रीने शेतकर्‍यांवर टीका केली होती. पण एका नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतकर्‍यांच्या अवमानावर गप्प बसले आहेत.‘बाबर’ सेनेनेसुद्धा इतका जुलूम केला नसता; पण हा देश सुजलाम् सुफलाम् करणार्‍या अन्नदात्या शेतकर्‍यांना भाजपसमर्थक मोदीभक्त ‘नटी’ने आतंकवादी ठरवले असल्याचे म्हणत भाजपने शिवसेनेवर टीका केली आहे.

मोदी सरकारने शेतकर्‍यांच्या हितासाठी एक विधेयक संसदेत आणले. हे विधेयक क्रांतिकारक, ऐतिहासिक, इतकेच नव्हे तर शेतकर्‍यांना दुसरे स्वातंत्र्य मिळवून देणारे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पाशवी बहुमत, जोरजबरदस्तीच्या दंडेलीवर हे विधेयक मंजूर करून घेतले. पण पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशात या विधेयकाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. ठिकठिकाणी त्यांनी चक्काजाम केला आहे. हे सर्व संयमाने आणि शांततेने सुरू असताना शेतकर्‍यांना दहशतवादी संबोधणे हे कसले लक्षण मानावे? शेतकर्‍यांवर लाठीमार केला, गुन्हे दाखल केले हा तर अतिरेकच म्हणावा लागेल. पंतप्रधान मोदी हे शेतकर्‍यांचे शत्रू आहेत असे आम्हाला कधीच म्हणायचे नाही. नव्या विधेयकाच्या दोन बाजू आहेत. सरकारने एपीएमसीमधील दलालशाही खतम केली व या मार्केटच्या बाहेरही शेतकर्‍यांला आपला माल विकता येईल, बाहेर माल विकला जाईल, तो विकत घेणारे नक्की कोण, हाच वादाचा विषय आहे. बडे उद्योगपती आता किराणा भुसार व्यवसायात गुंतवणूक करीत आहेत. म्हणजे कॉर्पोरेट कंपन्यांच्या नव्या गुलामीत शेतकरी फसणार तर नाही ना, अशी शंका शिवसेनेने उपस्थित केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like