चंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे : शिवसेना

पोलिसनामा ऑनलाईन टीम – महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला होता. तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळे पहाटे पहाटे फडणवीसांना जाग येत नाही, पण चंद्रकांत पाटील(Chandrakant Bacchu Patil) यांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. दादा, दचकू नका ! नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत, असे म्हणत शिवसेनेने भाजपा (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Bacchu Patil) यांना टोला लगावला.

शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut)यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते भेटत असतील तर नक्कीच राजकीय चर्चा होते. दोन-अडीच तास चहा बिस्कीटावर तर चर्चा होणार नाही असेही ते म्हणाले होते. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती असल्याचा दावाही केला होता. राज्यपालांची सकाळही का बिघडवता? तुमचा खेळ होतो व राजभवन नाहक बदनाम होते.

आता बदनाम होण्याचा राजभवनाचा कोटाही संपला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सरकार पुढची साडेचार वर्षे आरामात चालेल. सरकार दिवसरात्र काम करते व पहाटे थोडी साखरझोप घेते. संकट टळले की साखरझोपेत विघ्न येत नाही. पुढील साडेचार वर्षे पहाटेचा एकही राजकीय मुहूर्त पंचांगात दिसत नाही हे आम्ही छातीठोकपणे सांगत आहोत, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

राज्याच्या राजकारणात ‘वन फाइन मॉर्निंग’ अचानक काहीतरी घडेल, असे भविष्य चंद्रकांत पाटील यांनी वर्तविल्यापासून अनेकांचे घोडे स्वप्नातच उधळू लागले आहेत. फाइन मॉर्निंगला म्हणजे भल्या पहाटे काहीतरी घडेल असे चंद्रकांतदादांना का वाटते ते तपासून घ्यायला हवे. दादांची तब्येत वगैरे बरी आहे ना? त्यांना नीट झोप वगैरे लागते ना? की राजभवनातून अचानक एखाद्या फाइन मॉर्निंगला बोलावणे येईल म्हणून ते झोपतच नाहीत, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. चंद्रकांतदादांना फाइन मॉर्निंगला काहीतरी घडेल असे वाटते. हे काही चांगल्या प्रकृतीचे ‘साइन’ नाही. असे म्हणत शिवसेनेने टीका केली आहे.