भाजपाच्या अंताची सुरूवात महाराष्ट्रातूनच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झालेला असताना शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे सातत्याने शिवसेनेची भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडत आहेत. राज्यात शिवसेनाच सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करत भाजपाच्या अंताची सुरूवात ही महाराष्ट्रातूनच सुरू होणार असल्याचे वक्तव्य राऊत यांनी केली आहे.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच वाढला असताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले की, ‘सत्तास्थापनेचा गोंधळ हा शिवसेनेच्या मनात नाही. तो केवळ माध्यमांच्या मनात आहे. 2014 मध्ये युती तुटली होती. त्यानंतर आम्हाला युतीत जायची इच्छा नव्हती. भाजपानं त्यांचा सर्वात मोठा मित्रपक्ष गमावला आहे. भाजपाच्या अंताची सुरूवात ही महाराष्ट्रातूनच होणार आहे. येत्या काळात भाजपाला याची मोठी किंमत चुकवावी लागेल. राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल आणि त्याचं नेतृत्व हे शिवसेनाच करेल. शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच स्थिर सरकार स्थापन होईल आणि यासाठी कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. आम्ही विधीमंडळात बहुमत सिद्ध करताना 170 जणांचा पाठिंबा दाखवून देऊ. राष्ट्रपती शासन हे सहा महिन्यांसाठी लागू झालं आहे. ते संपण्यापूर्वी राज्यात सरकार स्थापन होईल.’

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप कायम असून काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना मिळून एकत्र सरकार बनविण्याच्या प्रयत्नात आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like