अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला आणि Ex PM इंदिरा गांधींच्या भेटीचं ‘वास्तव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीबाबत भाष्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना सुरुवात झाली होती. मात्र हे खरे आहे की इंदिरा गांधी आणि करीम लाला यांची एकदा भेट झाली होती आणि तीही दिल्लीच्या राष्ट्रपती भवनमध्ये त्यावेळी तेथे पद्म पुरस्काराचे वितरण केले जाणार होते.

1973 मध्ये प्रसिद्ध लेखक अभिनेते आणि कवी हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात येणार होता. चट्टोपाध्याय हा पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीला जात असताना करीम लाला यांनी त्यांनाही राष्ट्रपती भवन पाहण्याची इच्छा व्यक्त करत विनंती केली. यावर चट्टोपाध्याय यांनी त्यांना बरोबर घेतले. दिल्लीतील पद्म पुरस्कार सोहळ्यादरम्यान तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीदेखील त्या ठिकाणी हजर होत्या.

पुरस्कार सोहळ्यानंतर ज्यावेळी लोक एकमेकांना भेटत होते त्यावेळीच करीम लाला यांनी इंदिरा गांधी यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत एक फोटो देखील काढला. हा तोच फोटो आहे जो 47 वर्षानंतर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये झालेल्या या भेटीनंतर दोघांमध्ये पुन्हा भेट झाल्याचे कधीही समोर आले नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/