Shiv Sena | हा खोक्यांचा विजय, निकाल विकत घेतला; निवडणूक आयोगाच्या निकालावर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शिवसेना (Shiv Sena) आणि धनुष्यबाण चिन्हा (Dhanushyaban Symbol) बाबत मोठा निर्णय दिला आहे. शिवसेना (Shiv Sena) आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला (Shinde Group) दिले आहे. मागील सहा दशकांपासून ठाकरे आणि शिवसेना हे नातं आता संपुष्टात आल्याचे चित्र आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हा खोक्यांचा विजय असून हा निकाल विकत घेतल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे.

 

कोकण दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी सांगितले, ‘सत्यमेव जयते’ ऐवजी आता ‘असत्यमेव जयते’ असं करावं.
खोक्यांचा कुठपर्यंत वापर झाला हे या प्रकरणातून दिसून येत आहे. पाण्यासारखा पैसा वाहिला आणि हा पैसा कुठं गेला हे लोकांनी पाहिला आहे. शिवसेना (Shiv Sena) प्रमुख, शिवसैनिकांच्या त्यागातून पक्ष उभा केला. तो पक्ष 40 बाजारबुणगे विकत घेतता याची नोंद होणार आहे.

 

निवडणूक आयोगाने लोकांचा विश्वास गमावला आहे. स्वायत्त संस्था कशा प्रकारे संपवल्या जात आहेत, हे दिसून येत आहे.
निवडणूक आयोग असेल किंवा मग तपास यंत्रणा असेल हे कोणाच्यातरी गुलाम असल्यासारखं वागत आहे,
असं राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबई, महाराष्ट्रातून शिवसेना संपवावी यासाठी हा सगळा डाव असल्याचे राऊत म्हणले.

 

Web Title :- Shiv Sena | sanjay raut reaction on election commission order ekanath shinde party name shiv sena and the party symbol bow and arrow

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ravindra Jadeja | जडेजाने कसोटीत रचला विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला तर जगातील दुसरा खेळाडू

Pravin Darekar | शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘पवारांच्या बोलण्यावर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्व…’

Governor Bhagat Singh Koshyari | राष्ट्रवादीने प्रसिद्ध केले राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे ‘अधोगती पुस्तक’, दिला ‘हा’ शेरा