’साक्षी महाराजांनी BJP ची केली पोलखोल, AIMIM आहे भाजपाची गुप्त शाखा’, शिवसेनेचा ओवैसी यांच्यावर ‘हल्ला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – असदुद्दीन ओवैसी यांच्यावर भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यानंतर साक्षी महाराज आणि भाजपाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आता शिवसेनेने भाजपाला घेरत आपले मुखपत्र ’सामना’मध्ये लिहिले आहे – भारतीय जनता पार्टीने ओवैसी यांची पोलखोल केल्याने ‘दुध का दुध और पाणी का पाणी’ झाले आहे.

ओवैसी मियांची ‘अखचखच’ मुस्लिमांची तारणहार नसून भारतीय जनता पार्टीचे अंगवस्त्र आहे, अशी शंका लोकांना होतीच. परंतु भाजपाचे प्रमुख नेते साक्षी महाराज यांनी आता थेट म्हटले आहे की, होय, मियां ओवैसी भाजपाचेच पॉलिटिकल एजंट आहेत आणि ओवैसी यांच्या मदतीनेच आम्ही निवडणूक जिंकत असतो.

शिवसेनेने पुढे लिहिले आहे की, साक्षी महाराजांनी लोकांचा हा भ्रम दूर करून हे स्पष्ट केले आहे की, कमळाच्या फुलातील भूंगा मियां ओवैसी आहेत.

बिहार निवडणुकीत ओवैसींची भूमिका आणि भाजपाला मिळालेल्या फायद्यांबाबत शिवसेनेने म्हटले आहे की, बिहारमध्ये ओवैसी यांनी मुस्लिम बहुल सीमावर्ती क्षेत्रांमध्ये पाच जागा जिंकल्या आणि जवळपास 17-18 जागांवर तेजस्वी यादव यांचे नुकसान केले, अन्यथा बिहारमध्ये राजकीय परिवर्तन आवश्य झाले असते. मुस्लिमांची मते ‘सेक्युलर’ छाप राजग, समाजवादी पार्टी किंवा काँग्रेसकडे जाऊ नये, त्यांना एकतर्फी मते मिळू नये, यासाठी मियां ओवैसी यांचा उघडपणे वापर केला जात आहे.

शिवसेनेने पश्चिम बंगालमध्ये ओवैसी यांच्या एंट्रीवर सुद्धा प्रश्न उपस्थित करत लिहिले आहे की, बिहारच्या निवडणुकीवरून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. राष्ट्रीय लोकदल, काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी ओवैसीवर गंभीर आरोप केले आहेत. मुस्लिम मते कापून भाजपाला फायदा व्हावा, यासाठीच मियां ओवैसी यांची हालचाल सुरू असते, असा आरोप हे करत होते, तोपर्यंत तर ठिक होते परंतु भाजपाच्याच एका गटातून हे सर्व जाहीरपणे सांगितले जात आहे. पश्चिम बंगालमध्ये मियां ओवैसी यांनी जे काम सुरू केले आहे, त्यामुळे भाजपाचा चेहरा आनंदाने खुलला आहे.

ओवैसींच्या मदतीने भाजपाला बंगाल जिंकायचे आहे, म्हणजे हिंदूत्वविरोधी शक्तीचा वापर करून हिंदूत्वाचा जयजयकार करायचा आहे. मियां ओवैसी कायद्याचे एक चांगले जाणकार आहेत, त्याची जी रणनिती आहे, ती त्यांच्याकडे राहावी, मुस्लिमांचा जीवनस्तर सुधरावा, मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या जीवनातील अंधार आणि धर्मांधता दूर करण्यासाठी ओवैसी यांच्यासारख्या विद्वानांनी काम केले तर देशाचे भले होईल, परंतु हिंदुस्तानच्या पोटात वाढत असलेल्या दुसर्‍या पाकिस्तानला आणखी विषारी धर्मांध बनवून हे लोक राजकारण करत आहेत. त्यांचे राजकारण हिंदू द्वेषावर आधारित आहे.

ओवैसी यांच्या कुटुंबाकडून करण्यात आलेल्या एका वक्तव्यावर शिवसेनेने लिहिले आहे की, त्यांनी (ओवैसी) आणि त्यांच्या कुटुंबियांनी मागील काही दिवसात जी तीव्र वक्तव्य केली आहेत ती धक्कादायक आहेत. 25 कोटी मुस्लिम 100 कोटी हिंदुंवर भारी पडतील. पोलिसांना एका बाजूला करा, नंतर पहा आम्ही काय करून दाखवतो, अशाप्रकारची जहाल वक्तव्य ओवैसी यांचे भाऊ जाहिरपणे करतात. आता हेच ओवैसी भाजपाच्या विजयी रथाचे मुख्य चाक बनले आहेत. भारतीय जनता पार्टी ओवैसी यांच्या सारख्या लोकांची मदत घेऊन फायद्याचे राजकारण करतात.

मियां ओवैसी यांचा पक्ष त्यांची एक गुप्त शाखा आहे, हे भाजपाला स्वीकारावे लागेल. अशा अनेक गुप्त शाखा त्यांना प्रत्येक राज्यात जोपासल्या आहेत. त्यांचा जोर विभाजनावर आहे आणि महाराष्ट्राच्या मनपा तसेच इतर निवडणुकांमध्ये सुद्धा अशी मतविभाजन करणारी यंत्र बनवून ठेवली आहेत.