ते पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना : शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘आज के शिवाजी’ हे पुस्तक पंतप्रधान मोदींची तुलना महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने वादग्रस्त ठरले. हे पुस्तक लेखक जयभगवान गोयल यांच्याकडून मागे घेण्यात आले. परंतु शिवसेनेकडून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला गेला. आज के शिवाजी पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना असल्याची टीका शिवसेनेने सामनातून केली.

आज के शिवाजी – नरेंद्र मोदी या पुस्तकामुळे शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आणि महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी या ढोंगी प्रकाराचा निषेध केला पाहिजे, भाजप वाले आता म्हणत आहेत की गोयल यांच्याशी आमचा काय संबंध. संबंध कसा नाही. पक्ष कार्यालयात पुस्तक प्रसिद्ध झालं आणि तेव्हा भाजप नेते तेथे उपस्थित होते. यावर महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनीच बोलायचे आहे. 11 कोटी जनता बोलत आहे. छत्रपती शिवरायांचे वारसदार देखील चिडले आहेत. छत्रपती शिवरायांचा अपमान झाला आहे. अशा शब्दात भाजपवर शिवसेनेकडून टीका करण्यात आली.

सामनात लिहिण्यात आले की, छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर करण्यात आल्याने महाराष्ट्रात संतापाची वावटळ उठली आहे, त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. ही वावटळ पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात नाही हे समजून घेतले पाहिजे. मोदी यांच्या पाठीमागे हे सर्व उद्योग सुरू आहेत. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे एक पुस्तक भाजपच्या नव्या कोऱ्या चमच्याने लिहिले.

त्या पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात झाले. महाराष्ट्राच्या अकरा कोटी जनतेला हे अजिबात आवडले नाही. श्री. मोदी हे कर्तबगार आणि लोकप्रिय नेते आहेत, देशाचे पंतप्रधान म्हणून आज त्यांना तोड नाही, पण तरीही ते देशाचे छत्रपती शिवाजी आहेत काय ? त्यांना छत्रपती शिवरायांचे स्थान देणे योग्य आहे काय ? याचे उत्तर एका सुरात ‘नाही…नाही!’ असेच आहे. त्यांची तुलना जे छत्रपती शिवाजी महाराज्यांशी करतात, त्यांना शिवाजी राजे समजलेच नाही असा हल्लाबोल सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर करण्यात आला.

फेसबुक पेज लाईक करा –