… तर तो हिंदूंच्याच हातून मार खाणार, शिवसेनेचा भाजपावर घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हिंदूंचा स्वाभिमान हा प्रखर राष्ट्रवादाशी जोडला आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे वंशज आहोत. जो राष्ट्रवादाला मारण्याचा प्रयत्न करेल त्याला हिंदू समाजाकडूनच मार खावा लागेल अशी टीका शिवसेनेने भाजपवर केली आहे. विरोधी पक्ष फक्त बोलण्यापुरता उरला आहे. महाराष्ट्राला शांतता हवी आहे. दादामियांनी कितीही प्रयत्न केला तरी ही शांतता भंग पावणार नाही. हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. दादामिया गोधड्या भिजवत होते तेव्हा, शिवसेनाच आपल्या छातीचा कोट करून हिंदुत्व आणि राष्ट्रवादासाठी लढत होती. असा टोला सेनेने चंद्रकांत पाटलांना दिला आहे.

सामनाच्या अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे –
१) भाजपच्या दादामियांनी इतिहासाचे उत्खनन करून पाहावे की, २५ वर्षांपूर्वीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नामकरण हे संभाजीनगर म्हणून केले होते.

२) सध्याच्या भाजपच्या राजकारणाला काहीही अर्थ उरला नसून, देवेंद्र फडणवीस, भाजपचे ‘दादामियां’ चंद्रकांत पाटील हे सध्या चिंताग्रस्त आहेत. चंद्रकांत पाटील हे देवेंद्र फडणवीसांच्या पावालवार पाऊल टाकून चालले आहेत. नको तशी विधाने करीत आहेत.

३) औरंगाबाद चे नामकरण संभाजीनगर झालेच पाहिजे असे भाजपवाले ओरडत आहेत. आम्ही शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे वंशज आहोत असे सगळीकडे सांगत फिरत आहेत. त्यांचा हा आवेश पाहता त्यांची जीभ आणि बरेच काही सटकले आहे असे वाटते.

४) आम्ही शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे वंशज आहोत, हे स्वतः ओरडून सांगण्याची गरज भाजपाला नाही. महाराष्ट्रात कोणीही औरंगजेबाचे वंशज नाहीत. त्यांनी औरंगजेबाला गाडून टाकले आहे. याचा प्रत्येकाला सार्थ अभिमान आहे.

५) पंतप्रधान मोदी आताचे शिवाजी अशी पुस्तके भाजपवाले छापत आहेत. गेले पाच वर्षे ते शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे नाव घेत आहेत. त्यांनी आपण नक्की कोणाचे वंशज आहोत हे सिद्ध करावे.

६) देवेंद्र फडणवीसांना औरंगाबाद चे संभाजीनगर करायला कोणाची परवानगी हवी होती ? असा सवालही सेनेने विचारला आहे. औरंगाबाद हे संभाजीनगरच आहे असे ठणकावून सांगणारे हे बाळासाहेब ठाकरेच होते. प्रत्येक हिंदू अभिमानाने संभाजीनगर या नावाचा उल्लेख करतो. हे कार्य शिवसेनेने केले आहे. आणि याच विचारांवर शिवसेना काम करत राहील.

७) वीर सावरकर, संभाजीनगर हे मुद्दे तुमच्यासाठी फक्त राजकारणाचे विषय आहेत. ना सत्तेत असताना शिवस्मारकाची वीट रचली, ना सावरकरांना भारतरत्न दिला? नुसते तोंडी लावण्यापुरते हे विषय झाले आहेत.

८) तिकडे योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानतंर लगेच अलाहाबाद चे प्रयागराज केले, मग तुम्ही सत्तेत असूनही तुम्ही औरंगाबाद चे नामकरण संभाजीनगर असे का केले नाहीत. ?