‘आदित्य संवाद’ यात्रेनंतर आता शिवसेनेची ‘माऊली संवाद’ यात्रा, ‘होम मिनीस्टर’आदेश बांदेकर करणार ‘नेतृत्व’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा ‘आदित्य संवाद’ यात्रेनंतर आता शिवसेनेने आणखी एक पाऊल उचलले असून सचिव आदेश बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली उद्यापासून ‘माऊली संवाद’ यात्रा सुरु करणार आहे. राज्यात सध्या सगळीकडे विधानसभेचे वारे जोरात वाहत असून महत्वाच्या राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली असून राज्यातील सत्तेत असलेल्या शिवसेनेने देखील भाजपच्या एक पाऊल पुढे जात राज्यातील गृहिणींना डोळ्यासमोर ठेऊन या ‘माऊली संवाद’ यात्रेचे आयोजन केले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांशी तसेच सामान्य जनतेशी संवाद साधण्यासाठी दिखील शिवसेनेने कंबर कसली असून या यात्रेच्या निमित्ताने ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असून विधानसभेच्या आधीच ते राज्यातील जनतेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणार आहेत. या ‘माऊली संवाद’ यात्रेला उद्या सुरुवात होणार असून पालघर जिल्ह्यातील विक्रमगड या आदिवासी ठिकाणापासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी बीडमध्ये युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे या ‘माऊली संवाद’ यात्रेत सहभागी होणार आहे.

दरम्यान, आदेश बांदेकर हे ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमासाठी देखील ओळखले जात असून त्यांची महिलांमध्ये मोठी लोकप्रियता असून या संवाद यात्रेच्या माध्यमातून महिलांना देखील शिवसेनेकडे आकर्षित केले जाण्याचा प्रयत्न होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –