शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचे ‘संकेत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्ता स्थापनेचा दावा करण्यात शिवसेनेला काल अपयश आल्यानंतर आता काँग्रेस नेतेच सांगत आहेत की शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार. काँग्रेस नेते के सी पडवी म्हणाले की आम्ही बाहेरुन किंवा आतून शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतो आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार. तसेच कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरल्यानंतर सर्व काही होईल.

एकीकडे राज्यातील काँग्रेस नेते अशिष देशमुख यांनी राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी केली आहे. अशिष देशमुख म्हणाले की काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने होकार द्यावा. अनुभवी सरकारसाठी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी अशिष देशमुख यांच्याकडून करण्यात आली. त्यामुळे आता सत्तेचा पेच आणखी वाढतो की काय अशी साशंकता उपस्थित केली जात आहे. यामुळे काँग्रेस नेत्यामध्ये मतभेद आहेत की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार देखील म्हणाले की राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना मिळून सत्तास्थापन करेल. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आमचे हायकमांड शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल आहेत. कॉमन मिनिमम प्रोग्रामनंतर सर्व भूमिका स्पष्ट होईल.

एकीकडे आज 5 वाजता काँग्रेस नेते अहमद पटेल, वेणूगोपाल आणि खर्गे यांची शरद पवारांबरोबर बैठक होईल. या बैठकीत शिवसेनेचे नेते देखील उपस्थित राहू शकतात अशी चर्चा आहे. या बैठकीत सत्तास्थापनेचा निर्णय घेण्यात येईल.

राष्ट्रवादीला राज्यपालांनी 8.30 वाजेपर्यंत सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी कालावधी दिला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आज सत्तास्थापनेचा दावा करणार की नाही किंवा राज्यपाल त्यानंतर राष्ट्रपती राजवटीचा निर्णय घेणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.

 

Visit : Policenama.com