जळगावमध्ये शिवसेनेचा सफाया होणार : महाजन

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन

जळगावमध्ये भाजपची ताकद प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत जळगावमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सफाया होईल. शिवाय, शिवसेनेचाही एकही आमदार निवडून येणार नाही, असा दावा राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केला. जळगावमध्ये पार पडलेल्या भाजपच्या जिल्हा विस्तृत बैठकीत महाजन बोलत होते. महाजन यांच्या या वक्तव्यामुळे सत्तेत राहून भाजपला पाण्यात पाहणारा शिवसेना पक्ष महाजन यांच्या वक्तव्यावर कोणती प्रतिक्रिया व्यक्त करतो याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’316d570c-cd10-11e8-919b-777c7747d4b2′]

या बैठकीला भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे व खासदार रक्षा खडसे  अनुपस्थितीत होते. त्यामुळे तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. बैठक सुरू होतानाच ज्यांना आमंत्रण नसेल त्यांनी या बैठकीस बसू नये असे व्यासपीठावरून सांगण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ. बी. एस पाटील यांनी मला आमंत्रण आलेले नाही थांबू की जावू? असा प्रश्न विचारला. त्यावर जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पक्षाच्या शिस्तीप्रमाणे करा, असे सांगीतले. त्यावर पाटील बैठकीतून निघून गेले.

[amazon_link asins=’B008BRIDHQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’36f99feb-cd10-11e8-a98b-5b2df6bed3e6′]

बैठकीत बोलताना महाजन म्हणाले, जिल्ह्यात १०० टक्के आमदार हे भाजपाचे असतील. पेटड्ढोल, डिझेलच्या दराचा बाऊ करू नका. पक्षाने अनेक गोष्टी जनतेला दिल्या असून त्या घेऊन लोकांपर्यंत जा, सकारात्मक गोष्टींचा प्रचार करा, असे आवाहन महाजन यांनी पदाधिकाऱ्यांना केले. प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, खासदार ए.टी. पाटील, जि.प.च्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, आमदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पक्षातर्फे राबविण्यात येणार असलेल्या विविध कामांचा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी आढावा घेतला. सरदार वल्लभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौड, महात्मा गांधी जयंतीनिमित्त सर्व विधानसभा क्षेत्रात १५० कि.मी. पदयात्रा, जनजातीय क्षेत्र संपर्क अभियान, अनुसूचित जाती संपर्क अभियान, महिला क्षेत्र संपर्क अभियान, ज्येष्ठ नागरिक कुंभ दर्शन आदी विविध कार्यक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

मराठ्यांना ओबीसीमध्येच आरक्षण द्या : पुरुषोत्तम खेडेकर