खा. संजय राऊतांचा ‘शायराना’ अंदाज, शिवसेना ‘UPA’ मध्ये जाणार नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजूपासून सुरुवात होत आहे, एवढी वर्षे एनडीएचा घटक असलेली शिवसेना आतापासून एसडीएचा घटक असणार नाही, महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांना मिळालेली तुटपुंजी मदत यावरून शिवसेनेचे खासदार शून्य प्रहरात केंद्र सरकारला धारेवर धरणार आहेत. त्यामुळे आजपासून शिवसेनेचे संसदेतील स्वतंत्र अस्तित्व पहायला मिळणार आहे. त्यासाठी खासदार संजय राऊत दिल्लीला पोहचलेले आहेत.

शिवसेनेचे लोकसभेत 18 सदस्य तर राज्यसभेत 3 सदस्य आहेत आणि या दोनीही ठिकाणी शिवसेनेसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था आतापासून पहायला मिळणार आहे. 380 सदस्यसंख्या असलेल्या एनडीएतून शिवसेनेचे 18 सदस्य कमी झाल्याने एनडीएची सदस्य संख्या 362 इतकी झालेली आहे. मात्र शिवसेना युपीएमध्ये जाणार नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी आपल्या खास शेरो शायरीमधून राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

तुम से पहले वो जो इक शख़्स यहाँ तख़्त-नशीं था
उस को भी अपने ख़ुदा होने पे इतना ही यक़ीं था :-

अशा प्रकारे संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. बीजेडी देखील कोणत्याच गटात न जात स्वतंत्र बाकावर बसलेली आहे. त्यामुळे आता शिवसेना देखील स्वतंत्र बसून सरकार विरोधात आपला आवाज वाढवणार आहे. यावेळी प्रामुख्याने शिवसेना राज्यातील शेतकऱ्यांविषयी बोलेल असा अंदांज व्यक्त केला जातोय.

Visit : Policenama.com