अखेर भाजप अन् शिवसेनेत ‘फारकत’, BJP नं ‘हे’ केल्यानं चित्र स्पष्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एनडीएच्या बैठकीत शिवसेना सहभागी होणार नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. त्यामुळे आता शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार हे संकेत मिळाले आहेत. भाजप प्रणित एनडीएचा आता शिवसेना भाग नसल्याने संसदेत सभागृहात खासदारांच्या बसण्याचा जागा बदलणार आहेत. सत्ताधारी बाकावरुन आता शिवसेनेचे रवानगी विरोधी बाकांवर होणार आहे. संसदेचे अधिवेशन लवकरच सुरु होईल. खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई हे राज्यसभेचे खासदार आहेत.

या अधिवशेनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या घटक पक्षांची उद्या बैठक होणार आहे. परंतू या बैठकीत शिवसेना उपस्थित राहणार नाही हे स्पष्ट झाले आहे. याबाबत खुलासा खुद्द संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना एनडीएतूब बारे पडली तर त्यांच्या खासदारांची सभागृहात बसण्याची जागा बदलेलं आणि दोन्ही सभागृहाचे खासदार विरोधी बाकांवर बसतील.

लोकसभेत शिवसेनेचे एकूण 18 खासदार आहेत तर राज्यसभेत राजकुमार धूत, अनिल देसाई आणि संजय राऊत हे 3 आमदार आहेत. आता नव्या अधिवेशनात सत्ताधारी बांकावर बसणारे हे खासदार विरोधी बाकांवर बसतील. परंतू शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडण्याची अजूनही औपचारिक घोषणा करण्यात आली नाही, परंतू शिवसेनेच्या केंद्रीय मंत्राकडून राजीनामा देण्यात आला.

केंद्रात अवजड उद्योग मंत्रालय शिवसेनेकडे होते. राज्यातील राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेच्या अरविंद सावत यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा मागील आठवड्यात राजीनामा दिला. त्यानंतरच शिवसेनेने एनडीएतून काडीमोड घेतल्याचे सांगण्यात आले.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like