शिवसेनेच्या अनुराग शर्मा हत्याप्रकरणाचा ‘पर्दाफाश’ ! मदत केलेल्या मित्राचाच काढला काटा, भाजपा नेत्यासह 4 जणांना अटक

रामपूर : काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या माजी जिल्हा संयोजक अनुराग शर्मा यांच्या हत्याचा उलगडा झाला असून पोलिसांनी या प्रकरणात त्याचे मित्र व भाजपाचे माजी जिल्हा मंत्री छत्रपाल यादव आणि त्यांच्या भावासह ४ जणांना अटक केली आहे. अनुराग शर्मा यांची २० मे रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. छत्रपाल यादव व त्यांचा भाऊ पवन यांनी बाबु ऊर्फ हिमांशु आणि राजकिशोर यांना सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे.

अनुराग शर्मा आणि छत्रपाळ यादव हे दोघेही मित्र होते. छत्रपाल यादव याने काही वर्षांपूर्वी चिट फंड कंपनी काढली होती. त्यामुळे ज्यांनी पैसे गुंतविले होते. ते लोक आता पैसे परत मागू लागले होते. या कंपनीत छत्रपाल यादव याला नुकसान झाले. त्याच्यावर खटलेही दाखल झाले आहेत. अनुराग शर्मा याने मैत्रीखातर मदत म्हणून छत्रपाल यादव याला आपल्या पत्नीचे दागिने दिले होते. आता तो दागिने परत मागत होता. लोक त्याच्याकडे पैशांची मागणी करु लागले होते. बाबुचा अनुरागवर राग होता तर, राजकिशोर याने यापूर्वी एकदा अनुरागवर हल्ला केला होता. त्यामुळे यादव याने अनुरागला मारण्याचा कट रचला. त्याने बाबु आणि राजकिशोर यांना बोलावून दोघांना अनुरागची सुपारी दिली. ठरल्यानुसार २० मे रोजी पवन याने मोटारसायकल, २ काडतुसे व पिस्तुल पुरविले. दोघांनी २० मे रोजी स्कुटीवरुन घरी जात असताना अनुराग यांना आगपूर रोडवर गोळी घालून ठार केले होते. पोलीस अधीक्षक शगुन गौतम यांनी या पोलीस पथकाला २० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like