टाकळी विंचुर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेनेच्या अश्विनी जाधव विजयी

लासलगाव  : पोलीसनामा ऑनलाइन  –  टाकळी विंचुर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेनेच्या अश्विनी जाधव तर उपसरपंचपदी ज्ञानेश्वर मोकाटे हे विजयी झाले आहेत. निफाड पंचायत समिती माजी सभापती तथा विद्यमान सदस्य शिवा पाटील सुरासे यांच्या नेतृत्वाखाली टाकळी विंचूर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकावला आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. पी वाघ तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक पी बी निकम यांनी काम पाहिले. सरपंच पदासाठी अश्विनी जाधव यांना ८ तर विरोधी गटाच्या वर्षा काळे यांना ७ मते पडली आणि उपसरपंच पदासाठी ज्ञानेश्वर मोकाटे यांना ८ तर केशव जाधव यांना ७ मते पडली त्यामुळे अश्विनी जाधव सरपंच पदासाठी ज्ञानेश्वर मोकाटे यांची उपसरपंच पदासाठी निवड जाहीर करण्यात आली.

सलग पंधरा वर्षापासून शिवा पाटील सुरासे यांचे नेतृत्वाखाली टाकळी विंचुर ग्रामपंचायतीत सत्ता आहे पुन्हा एकदा ग्रामस्थांनी शिवा पाटील सुराशे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात दिली आहे.
याप्रसंगी सदस्य ज्योती सुरासे, पूनम आमले, अश्विनी जाधव, संगीता पाचोरकर ,दिपाली लाड,हरी गवळी, ज्ञानेश्वर मोकाटे ,नाना राजगिरे ,केशव जाधव, संतोष राजोळे,वर्षा काळे, राम बोराडे, ललिता पठारे, नीता अहिरे ,अनिल माळी आदी सदस्य उपस्थित होते.

याप्रसंगी शंकरराव शिंदे ,अशोक आमले, चांगदेव शिंदे, पंढरीनाथ पवार, लक्ष्‍मण जाधव, बाळासाहेब मोकाटे, रामनाथ सुराशे, बापू जाधव, सचिन जाधव, पांडुरंग जाधव, सोमनाथ केंदळे, उत्तम उशीर, रईस शेख, सुनील कवडे, गणेश कापसे, नेताजी खुर्दे ,निवृत्ती खुर्दे ,संतोष जाधव ,जीवन अहिरे, मोहन राजोळे, कैलास लाड, भाऊसाहेब राजगिरे ,रेवन्नाथ शिंदे, शरद शिंदे, नवनाथ चव्हाण, केशव मोकाटे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवा सुराशे यांचा असाही मनाचा मोठेपणा…..

अत्यंत प्रतिष्ठेची झाली टाकले ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यांचे नेतृत्वाखाली कर्मयोगी पॅनल निवडून आले होते. आज झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत आपल्या पत्नी ज्योती सुरासे सर्वसाधारण जागेतून निवडून आलेले असतानाही सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळावी म्हणून अश्विनी जाधव यांना सरपंच पदासाठी उमेदवारी देऊन सरपंच करण्यात आले, एकूणच शिवा पाटील सुरासे यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत आपले वेगळेपण सिद्ध केले.