काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेपूर्वी शिवसेनेची बॅनरबाजी

भोकर : पोलीसनामा आॅनलाइन (माधव मेकेवाड) – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भोकर येथे आज जनसंघर्ष यात्रेनिमित्त जाहीर सभा दुपारी ३ वाजता आयोजित केली होती. त्या अनुषंगाने भोकरमध्ये कॉंग्रेसमय वातावरण निर्माण करण्यासाठी अहो रात्र प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्यांमधून होत असताना काँग्रेसची पोस्टबाजी व काँग्रेस पक्षाचे पक्ष चिन्हांचे पताके, झेंडे भोकर शहरात सर्वत्र लावलेले असताना, काही विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मात्र भोकर शहरातील भ्रष्टाचार संदर्भातील मोठ मोठी बॅनर लावले आहेत. काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार उघडपणे लोकांना माहीत असताना देखील ह्या जनसंघर्ष यात्रा अभियानासंदर्भात मोठी मान्यवर नेते मंडळी येते असल्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्तानी बॅनर लावल्याची चर्चा भोकरच्या नागरिकांमध्ये सुरु आहे.

काँग्रेसच्या सभेपूर्वी शिवसेनेची बॅनरबाजी सुरू आहे. काँग्रेस जनसंघर्ष यात्रेची भोकर येथे आज अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भोकर येथे  ऐतिहासिक सभा दुपारी ३:००  वाजता होणार आहे. त्याची बॅनरबाजी पाहून विरोधक मात्र सर्व मागील काही वर्षांपासून भोकर शहरात होत आलेला कॉंग्रेसमय भ्रष्टाचार संदर्भातील काही बॅनर शहरात लावलेले आढळून आले. त्यावर प्रकाशक म्हणून शिवसेना शाखा भोकरच्या वतीने असा उल्लेख केलेला आहे.

त्यावर स्पष्ट अक्षरात असे लिहले आहे की काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा म्हणजे…..?

नगर परिषद बोगस नोकरी भरती करणारे…..
दलित वस्तीचा निधी हडपणारे….
रस्ते बांधकाम घोटाळेबाज…..
घनकचरा शासन निधी हडपणारे….
आदर्श घोटाळेबाजांची पाठराखण करणारे….
काय जनसंघर्ष करणार…?
असे प्रश्नार्थक बॅनरबाजी भोकर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी केलेली आहे.
यावर अशोक चव्हाण सभे वेळी काय प्रतिउत्तर देतील याकडे सर्व भोकर वासीयांचे लक्ष वेधून आहे.