शिवसेनेचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘वर्षभरापूर्वी तुम्हाला ‘धुतले’ ते काय कमी झाले ?’

पोलीसनामा ऑनलाइन – सध्या भाजपातर्फे मुंबई-महाराष्ट्रात वीज बिलाबाबत रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन सुरु केले केले. भाजपाच्या या वागण्यामुळे कोरोना पसरत आहे. त्याचा प्रसार वाढत आहे. लोकांच्या जीवाशी खेळत आहोत. रस्त्यावर गर्दी करून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून पुन्हा सरकारच्या नावे शिमगा केला. स्वतःचा शांत करून घेतले. अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून आली आहे. भाजपाचे अनेक खासदार व केंद्रीयमंत्री कोरोनाने आजारी पडले.तर केंद्रीय मंत्री सुरेश आंगडिया कोरोनाचे बळी ठरले. रामविलास पासवान ही कोरोनाने गेले. अनेक खासदार कोरोनाग्रस्त झाले. याची खबरदारी कोणी घ्यायची? असा सवाल ‘सामना’च्या अग्रलेखातून केला आहे.

कोरोनाची दुसरी लाट येत आहे पण भाजपला वाटत आहे की लाट त्यांच्या राजकीय विचारांची आहे. त्याच लाटेवर शिडी लावून मुंबई पालिकेवरील भगवा उतरू. आम्ही म्हणतो ठीक आहे तुमचे राजकारण तुमच्यापाशी पण त्यासाठी लोकांना कोरोनाच्या खाईत ढकलता? जागतिक आरोग्य संघटनेचे वगैरे एक वेळ सोडून द्या, पण पंतप्रधान मोदी हे गर्दीचे प्रसंग टाळा सोशल डिस्टंसिंग चे भान राखा असे आवाहन वारंवार केले आहे. पण, पंतप्रधान मोदी यांनीही गर्दीचे प्रसंग टाळा, शारीरिक अंतर याचे भान राखा, असे आवाहन वारंवार केले आहे. मुंबईवर शुद्ध भगवा फडकवण्याच्या नादात भाजप कोरोनाचा प्रसार वाढवत आहे. कोरोनाची दुसरी लाट येत आहे पण भाजपला वाटत आहे की लाट त्यांच्या राजकीय विचारांची आहे. त्याच लाटेवर शिडी लावून मुंबई पालिकेवरील भगवा उतरू. आम्ही म्हणतो ठीक आहे तुमचे राजकारण तुमच्यापाशी पण त्यासाठी लोकांना कोरोनाच्या खाईत ढकलता, असा प्रश्न देखील भाजपाला करण्यात आला आहे.

गुजरात, हरियाणा, राजस्थान, मणिपुर या राज्यांत केंद्राने कोविड पाहणी संदर्भात खास पथके तैनात केली. याचा अर्थ या राज्यातील स्थिती चांगली नाही. महाराष्ट्राची स्थिती नियंत्रणात आणली तर विरोधी पक्षातून एकाच गोष्टीचा तगादा लावला जातो ते म्हणजे हे उघडा आणि ते उघडा आणि कोरोना महामारी पसरू द्या मग त्याचे खापर सरकारवर फोडून आता शांत करा, असा आरोप शिवसेनेने केला आहे. तसंच, देशाची राजधानी हे फक्त अरविंद केजरीवाल यांच्या आपचे राज्य नाही. ती देशाची राजधानी आहे. त्यामुळे केजरीवाल सरकारला नियंत्रणासाठी सर्वतोपरी मदत करणं हे केंद्र सरकारचं कर्तव्यच आहे.

‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर केलेली टीका

आपल्या पंतप्रधानांचे तरी ऐका असे सांगणे म्हणजे गुन्हा ठरतोय. कारण, पंतप्रधान फक्त भाजपचे किंवा भाजपाशासित प्रदेशाचे असा नवा पायंडा या मंडळींनी पडला आहे. तो लोकशाहीचा, स्वतंत्र व हिंदुस्थानच्या संघराज्यास घातक आहे. देशात महागाई, आर्थिक मंदी, बेरोजगार, काश्मीरातील रक्तपात चीनची लडाखमध्ये घुसखोरी असे अनेक चिंतेचे विषय आहेत. त्यावरील लक्ष हटविण्यासाठी शुद्ध भगवा व कोरोना महामारीसारखे विषय वाढले जात आहेत काय?सध्या महाराष्ट्रातील काही किरकोळ, पक्षांतर केलेले भाजप नेते प्रश्न विचारतात, की महाराष्ट्रातील काही चवली पावली चे उपरे भाजप नेते प्रश्न विचारतात की “हात धुवा” असे सांगण्याव्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारने काय केले? त्यांना उत्तर असं की, वर्षभरापूर्वी तुम्हाला धुतले ते काय कमी झाले. आता जनता हात धूत आहे, मास्क लावत आहे. तुम्हाला तुमचे काही धुता येत नसेल, तर लोकांची सुटका बिघडवता कशाला? महामारीचे संकट चीनमधून आले हा समज खोटा आहे. कोरोना महामारीचे बाप आपल्या भॊवती वावरत आहेत.