सातारा लोकसभा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत भाजपला सोडायचा नाही

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा लोकसभा मतदार संघात निष्ठावान व सच्चा शिवसैनिकालाच उमेदवारी दिली पाहिजे. सातारा लोकसभा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत भाजपला सोडायचा नाही. असा ठराव सातारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज घेतलेल्या शिवसेनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत केला आहे. याबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे हा ठराव मांडला जाणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, सातारा शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करणात आले होते. दरम्यान या बैठकीत नितीन बानुगडे-पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी माजी आमदार बाबुराव माने यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावेळी, शिवसेनेने भाजपशी राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर युती केली आहे. १९९५ च्या लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली असून सर्व शिवसैनिकांनी गतीने कामाला लागावे. बुथ कमिट्यांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. लोकसभेचा उमेदवार कोण ?  हे दोन दिवसांत मातोश्रीवरुन घोषित होईल. उमेदवार कोण हे महत्त्वाचं नाही, लोकसभेत शिवसेनेचा खासदार जाणं हे महत्त्वाचं आहे. सर्वांसाठी युध्दाचा काळ सुरु झाला आहे. असे नितीन बानगुडे पाटील यांनी म्हंटले.

याचबरोबर, या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी निष्ठावान शिवसैनिकाला मिळावी, ही सर्वांची मागणी आहे. बाहेरचा उमेदवार यायचा.आमचा वापर करुन जायचा, असे आता होता कामा नये. धनुष्यबाण हाच शिवसेनेचा उमेदवार आहे. पक्षाला घातक अशा चर्चा कोणीही करु नये, लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, असे वागू नका. उमेदवार घोषित केल्यानंतर त्याच्या प्रचाराच्या कामाला सर्वांनी लागायचे आहे. असे चंद्रकांत जाधव यांनी म्हंटले.

यावेळी, शिवसेनेचे संपर्क प्रमुख व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे-पाटील, माजी आमदार बाबुराव माने, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, जयवंत शेलार, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय मोहिते, उपाध्यक्ष सचिन मोहिते, दिनेश बर्गे, प्रताप जाधव आदी उपस्थित होते.

 

ह्याही बातम्या वाचा –

मला ‘सर’ नाही फक्त ‘राहुल’ म्हणा : राहुल गांधी

मोदींचे राफेल कागदपत्रात नाव : राहुल गांधी

SBI ची वॉर्निंग : या व्हॉट्सअ‍ॅप मेसेजपासून सावध रहा अन्यथा

आग विझविण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना मारहाण

बीडमध्ये ६ दुकानांना भीषण आग, ३ लाखांची रोकड जळाली

You might also like