‘अति तेथे माती.. शिवसेनेचा अंत जवळ आला आहे’ : निलेश राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणे यांचे सुपुत्र आणि भाजपचे नेते निलेश राणे यांच्याकडून पुन्हा डिवचण्यात आले आहे. काल नाणार रिफायनरी प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर आज त्यांनी ड्रग्स प्रकरणावरून शिवसेनेवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेची काय ओळख होती आणि आता काय झाली आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे अति तेथे माती … अशी मराठी मध्ये म्हण आहे शिवसेनेचा आता अंत जवळ आला आहे अशा शब्दात निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

सध्या चर्चेत असलेल्या ड्रग्स प्रकरणावरून शिवसेनेच्या एका उपनेत्याच्या मुलाची पोलिसांनी चौकशी केल्याचे वृत्त एका वृत्तपत्रात प्रकाशित झाले होते, त्याचा आधार घेत निलेश राणे यांच्याकडून शिवसेनेवर गंभिर आरोप करण्यात आले आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हणले आहे कि काय ओळख होती शिवसेनेची आता काय झाली आहे. शिवसेनेची ड्रग्स व्यापारी, खंडणी मागणारे, मर्डर केस अशी ओळख बनली आहे. मराठीमध्ये म्हण आहे अति तेथे माती.. शिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे असा टोला निलेश राणे यांच्याकडून लगवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात निलेश राणे यांच्याकडून सतत शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. काल निलेश राणे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाणार रिफायनरी प्रकल्पावरून लक्ष्य करण्यात आले होते. मुख्यमंत्र्याच्या मावस भावाने नाणार प्रकल्पबाधितांची १४०० एकर जमीन विकत घेतल्याचा आणि या जमिनीच्या व्यवहारात ८० टक्के परप्रांतीयांना जमिनी दिल्याचा दावा निलेश राणे यांच्याकडून करण्यात आला आहे.

या संदर्भात निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये ते म्हणाले नाणार प्रकल्प रद्द झाला आहे असे सांगितले जात असताना मुख्यमंत्री कार्यालयाशी चर्चा का होतेय ? हा प्रकल्प रायगडमध्ये नेण्यासाठी नाही तर राजापूर मधील नाणारमध्ये हा प्रकल्प राबवण्यासाठी शासनातील काही अधिकारी आणि कंपनी यांच्याकडून प्लॅनिंग करण्यात येत आहे. नाणार पुन्हा राजापूरमध्ये आणण्यासाठी हे सगळे एकत्र आले आहेत. नाणार येथे सुगी डेव्हलपर्स नावाची एक कंपनी आहे त्या कंपनीचे संचालक निशांत सुभाष देशमुख आहेत. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत. त्यांच्याकडून १४०० एकर जमिनीचा व्यवहार करण्यात आला आहे. हा व्यवहार ज्यांनी केला ते ॲड. कावतकर हे कोदवलीचे आहेत. सगळे व्यवहार लिमिटेड लायब्रेटी पार्टनरशिपद्वारे करण्यात आले आहेत. २०१४ ते २०१९ या दरम्यान व्यवहार झाला असा दावा निलेश राणे यांच्याकडून केला जात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like