शिवसेनेचा मुक्ता टिळक यांना संपूर्ण पाठिंबा, बंडखोरांवर कारवाई नक्कीच : नीलम गोऱ्हे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुती च्या कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार यांना शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे अशी ग्वाही शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिली.

भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रासप, शिवसंग्राम पक्षांच्या कसबा मतदार संघातील उमेदवार मुक्ता शैलेश टिळक यांच्या प्रचारार्थ महिला रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. शिवसेना, भाजप, रिपाईचे नगरसेवक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महात्मा फुले वाड्यामध्ये ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून निघालेल्या या महिला रॅलीमध्ये महिला कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला. लोया नगर मार्गे लाल महाल येथे रॅलीची सांगता झाली.

यावेळी गोऱ्हे म्हणाल्या, ‘पुणे जिल्ह्यातील सर्वच उमेदवार निवडून येणार याबद्दल शंका नाही. बंडखोरांनी कितीही कांगावा केला तरी जनतेला असते ठाऊक आहे. टिळक म्हणाल्या, ‘महायुतीने केलेली विकास कामे नागरिकांना भावली आहेत. त्यामुळेच महायुतीच्या सर्वच उमेदवारांना वाढता प्रतिसाद मिळत आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी