शिवसेनेने ‘आयत्या बिळावर नागोबा’ ही वृत्ती कायम असल्याचे दाखवून दिले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांनी आज दादर शिवाजीपार्क चौपाटीच्या सुशोभीकरणाच्या कामाला भूमिपूजनाचा घाट घालून ‘आयत्या बिळावर नागोबा’ ही आपली वृत्ती कायम असल्याचे दाखवून दिले आहे. अशी टीका मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी केली आहे.

२०१२ मध्ये दादर शिवाजीपार्क चौपाटीच्या सुशोभीकरणाच्या कामाचे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. त्यावेळी चौपाटीवर धूप प्रतिबंधात्मक बंधारा बांधण्यास सुरुवात झाली होती. तसेच २०१४ मध्ये चौपाटीच्या बंधाऱ्यावर सुशोभीकरणास सुरुवात होऊन ते पूर्णही झाले होते. दरम्यान, मनसेला या कामाचे श्रेय मिळू नये म्हणून मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने महापौर बंगल्याला लागून असलेल्या पदपथाच्या वापरास विरोध केला आणि त्या जागेवर कुंपणच घालून ठेवले, ज्यामुळे त्या पदपथावरून चालणे सुद्धा अशक्य झाले, असे मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी म्हंटले आहे.

इतकेच नव्हे तर, शिवसेनेचे सदा सरवणकर २०१४ मध्ये दादर – माहीमचे आमदार म्हणून निवडून आले, याचबरोबर शिवसेनेचेच राहुल शेवाळे खासदार म्हणूनही निवडून आले. पण मागील साडे चार वर्षात त्यांचे दादर चौपाटीकडे लक्ष नव्हते. मात्र आज दिनांक ६ मार्चला अचानक जो बंधारा २०१४ सालीच बांधून पूर्ण झाला आहे, जिथे सुशोभित वॉक-वे आधीच तयार आहे, तिथे केवळ राजकीय लाभासाठी नव्याने भूमिपूजन केले, जात असल्याचे त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, आम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरा राजकीय पक्ष घेतोय याचे दुख नाही, पण मनसेला श्रेय मिळू नये म्हणून शिवसेनेने विनाकारण गेली ५ वर्षे ह्या बंधाऱ्यावरून चालण्यास लोकांना बंदी केली होती आता निवडणुका जवळ आल्यावर यांना दादर चौपाटीची आठवण आली. हे मात्र निश्चितच दुर्दैवी आहे. असेही त्यांनी म्हंटले.

महत्वाच्या बातम्या       

माहितीच्या अधिकाराखाली कुणीतरी अर्ज करतो आणि नाहक चौकशीला सामोरे जावे लागते

महाराजांचे नाव घेण्याची राज्यकर्त्यांची लायकी नाही : डॉ. अमोल कोल्हे

कागदपत्रे चोरणारा चौकीदार तर नाहीना : जितेंद्र आव्हाड

अहमदनगरच्या बदल्यात काँग्रेसने राष्ट्रवादीला दिली या जागेची ‘ऑफर’ ?