शिवसेनेच्या तानाजी सावंत यांची अप्रत्यक्षपणे भाजपला ‘साथ’

उस्मानाबाद :पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने तीनही पक्षातील बरेच नेते पक्षश्रेष्ठींवर नाराज होते. अनेक नाराजांनी तर या विरोधात जाऊन शक्ती प्रदर्शन देखील करण्याचा प्रयत्न केला. तसेच काहीसे चित्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दिसून येत आहे. शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी देखील पक्षाचा निर्णय डावलत भाजपसोबत हात मिळवणी केल्याचे दिसून आले आहे.

शिवसेनेचे तानाजी सांवंत हे मंत्रिपद न मिळाल्याने पक्षावर नाराज होते त्यामुळे त्यांनी आपला पुतण्या धनंजयला भाजपच्या गोटातून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आहे. सावंत यांनी आता थेट पक्षविरोधातच कामाला सुरुवात केली आहे.

आकडेवारीचे गणित नेहमीच राजकारणात उपयोगी पडते. ५४ सदस्यांच्या संख्येमध्ये राणा जगजित सिंह हे भाजपमध्ये होते तर महाविकास आघाडीने त्यांच्या पराभवासाठी प्रयत्न सुरु केले होते मात्र तानाजी सांवंत यांनी पक्षाचा निर्णय फाट्यावर मारत आपल्या सहा सदस्यांसह थेट भाजपच्या गोटात सामील झाले आहेत.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी तयार झाली आहे मात्र जिल्हा परिषद सारख्या निवडणुकीत शिवसेनेच्या तानाजी सावंत यांनी बदललेली दिशा लक्षात घेता शिवसेना पक्षप्रमुख त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/