‘आरे’ खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा शिवसेनेचा ‘डाव’, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आरे मधील झाडे रातोरात कापल्यानंतर शिवसेनेने आरेला पुन्हा जंगल घोषित करू अशी घोषणा केली होती आणि सत्तेवर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेच्या कारशेडला स्थगिती दिली. मात्र आता शिवसेना आरेला खाजगी विकासकांच्या घशात घालणार आहे असा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

आज शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांनी आरे मधील पाडे व इतर बांधकाम पुनर्विकसित करण्यासाठी एका छोट्या भूखंडावर निवासी आरक्षण करून या पट्ट्यातील घरांना पुनर्विकसित करावे अशी मागणी केली.

शिवसेनेच्या या मागणीनंतर भाजपचे आमदार आशिष शेलार आणि अतुल भातखळकर इतर आमदारांनी थेट शिवसेनेचा हा आरेतील भूखंड हडप करण्याचा डाव असल्याचे असल्याचे सांगत जोरदार आक्षेप नोंदवला. नंतर पत्रकारांशी बोलताना शेलार म्हणाले पाड्यातील आदिवासी लोकांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे आणि त्यांची संस्कृती देखील जपली गेली पाहजे. परंतु यासाठी भूखंड विकासकांना देऊन कोणी येथील जागा हडपण्याचा प्रयत्न करत असेल तर तो प्रयत्न आम्ही हाणून पाडू.

ज्या शिवसेनेने कारशेडला स्थगिती दिली त्यांचेच आमदार आरेतील भूखंड निवासी करा अशी मागणी करत आहेत. मात्र आरेतील कारशेड ऐवजी दुसऱ्या कोणत्या जागेचा विचार करता येऊ शकतो का यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली आहे आणि येत्या १५ दिवसात याबाबतचा अहवाल द्यावा असे राज्य शासनाने या समितीला सांगितले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/