शिवसेनेचे विजय शिवतारे पाच हजार पेक्षा अधिक मताधिक्याने पिछाडीवर

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानभेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे, पुरंदरमध्ये शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे हे पाच हजरांपेक्षा अधिक मतांनी पिछाडीवर आहेत. पुरंदर विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे सध्या साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी राज्यमंत्री विजय शिवतारे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्यात सरळ लढत होत आहे. मात्र मतमोजणीच्या नवव्या फेरीनंतर संजय जगताप यांनी लीड घेतल्याचे पहायला मिळत आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या शिवतारे यांनी ८२ हजार ३३९ मते घेऊन विजय मिळवला. दुसऱ्या क्रमांकावर संजय जगताप होते. त्यांना ७३ हजार ७४९ मते मिळाली. तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक टेकावडे होते. २००९ मध्ये ४४ हजारांच्या वर मते घेणाऱ्या ‘राष्ट्रवादी’ला २०१४मध्ये फक्त २८ हजार मतांवर समाधान मानावे लागले. यंदा आघाडी असल्याने ‘राष्ट्रवादी’चे एकगठ्ठा मतदान जगताप यांना मिळाल्यास शिवतारे यांच्या पुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ग्रामपंचायत सदस्य, सरपंच ते आमदार आणि राज्यमंत्री अशी कारकीर्द असणाऱ्या जनता दलाचे नेते दादा जाधवराव यांची २००४ पूर्वी पुरंदरवर एकहाती पकड होती. मात्र, २००४मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अशोक टेकवडे यांनी विजय मिळवून जाधवराव यांना धक्का दिला. यानंतर २००९मध्ये शिवतारे यांनी ‘राष्ट्रवादी’च्या वर्चस्वाला शह देऊन तालुका ताब्यात घेतला. तेव्हापासून शिवतारे येथून प्रतिनिधीत्व करीत आहेत. शिवतारे यांनी तालुक्यात शिवसैनिकांची फळी उभारली. याचा परिणाम म्हणजे पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

Visit : Policenama.com