Shiv Thakare | अखेर शिव ठाकरेने वीणा सोबतच्या त्याच्या नात्याबाबत केले भाष्य; म्हणाला “आमच्यातील मैत्री अजूनही…..”

पोलीसनामा ऑनलाइन : नुकताच ‘बिग बॉसचा 16’ पर्व संपला. पुण्यातील रॅपर एमसी स्टॅन हा यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला. यावेळी एमसी स्टॅनला मराठमोळा शिव ठाकरेने (Shiv Thakare) मात्र जबरदस्त टक्कर दिली होती. शिव ठाकरे बिग बॉस मराठी सीजन 2 चा विजेता ठरला होता. आपला माणूस शिव ठाकरे यंदाचा बिग बॉस 16 चा विजेता ठरावा अशी चाहत्यांची इच्छा होती. मात्र शिवला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. त्यानंतर अमरावतीकरांनी शिवचे (Shiv Thakare) जंगी स्वागत केले. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शिवने त्याच्या आणि वीणाच्या नात्यावर भाष्य केले आहे.

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात शिव ठाकरे आणि वीणा जगतापची मैत्री सर्वांनाच आवडली होती. यानंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि घरातून बाहेर येताच त्यांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. मात्र हे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि त्यांच्या ब्रेकअप मुळे चाहते मात्र नाराज झाले होते. शिवने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी वीणाबद्दल भाष्य केले. यावेळी बोलताना शिव म्हणाला, “वीणाचे आणि माझे ब्रेकअप जरी झाले असले तरी बिग बॉस मध्ये येण्याआधी आम्ही एकमेकांशी संवाद साधला. आमच्यातली मैत्री मात्र कायम आहे. बिग बॉस 2 आणि बिग बॉस 16 हे दोन्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. या प्रवासात अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. या प्रवासातील नाती कधीच न विसरू शकणारी आहेत. दोन्ही बिग बॉस मध्ये मी प्रामाणिकपणे खेळलो आणि बिग बॉस 16 चा विजेता झालो नाही या गोष्टीचा मला पश्चाताप झालेला नाही”.

शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि वीणा जगताप बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वा मध्ये सहभागी झाले होते.
यावेळी त्यांच्यातील मैत्री प्रेक्षकांना फारच भावली होती. हे दोघे रिलेशनशिप मध्ये असल्याची माहिती मिळताच चाहते आनंदी झाले होते. मात्र त्यांच्या ब्रेकअप नंतर त्यांच्या नात्याची तुफान चर्चा झाली.
ब्रेकअप नंतर देखील हे दोघे एकमेकांशी बोलत असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
अखेर शिवने त्याच्या या वक्तव्यातून त्यांच्यातील मैत्री कायम असल्याचे सांगितले आहे.

Web Title :- Shiv Thakare | bigg boss 16 fame shiv thakare says about veena jagtap and relationship

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Masuta Marathi Movie | विविध सामाजिक गोष्टींवर भाष्य करणारा ‘मसुटा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Pune Crime News | फुरसुंगीत राडा ! गाड्यांवर, घरांवर दगडफेक करत तरुणाला बेदम मारहाण; 7 जणांवर FIR

Harmanpreet Broke Rohit Record | हरमनप्रीत कौरने मोडला रोहित शर्माचा ‘हा’ विक्रम; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय