Shiv Thakare | शिव ठाकरेला ‘या’ खास पुरस्काराने करण्यात आले सन्मानित; सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे शुभेच्छांचा वर्षाव

पोलीसनामा ऑनलाइन टीम – यंदाचा बिग बॉस 16 हा खूपच रंजक होता. स्पर्धकांनी त्यांच्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यातच मराठमोळा शिव ठाकरेने (Shiv Thakare) तर सर्वांनाच थक्क केले होते. शिव त्याच्या अथक प्रयत्नाने फर्स्ट रनर अप ठरला. त्याने विजेतेपद जरी जिंकले नसले तरी त्यांनी प्रेक्षकांची मने मात्र जिंकली आहेत. बिग बॉस नंतर शिवच्या चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले. आता पुन्हा एकदा शिवला (Shiv Thakare) नवीन शो मध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक अतुर झाले आहेत. शिवच्या चाहत्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. शिवला पुन्हा एकदा एका खास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

मनोरंजन सृष्टीतील महत्त्वाचा समजला जाणारा आयकॉन गोल्डन अवॉर्ड 2023 हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकार त्याचबरोबर छोट्या पडद्यावरील कलाकारांनी देखील उपस्थिती लावली होती. त्यामध्ये कपिल शर्मा, दिया मिर्झा, करण कुंद्रा तसेच अंकिता लोखंडे ही उपस्थित होते. तर बिग बॉसच्या स्पर्धकांमध्ये शिव ठाकरे, अब्दू रोजीक आणि प्रियांका चौधरी देखील दिसून आले. या सोहळ्यात शिव ठाकरेचा बिग बॉसमधील सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्व हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

या पुरस्काराची घोषणा होताच यामध्ये शिव ठाकरेचे (Shiv Thakare) नाव ऐकून सर्वांनाच फार आनंद झाला.
पुरस्कार स्वीकारताना शिव ठाकरे देखील खूपच आनंदीत दिसत होता.
पुरस्कार मिळाल्यानंतर सध्या सोशल मीडियावर शिववर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
शिव ठाकरेने काही दिवसांपूर्वीच स्वतःच्या मेहनतीने नवीन गाडी खरेदी केल्याने तो चर्चेत होता.
आता या पुरस्काराने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
लवकरच शिव ठाकरे ‘खतरो के खिलाडी’ मध्ये झळकणार असल्याने प्रेक्षक त्याला पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

 

Web Title :- Shiv Thakare | bigg boss 16 first runner up shiv thakare wins most popular contestant iconic gold awards 2023

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Deepak Kesarkar | राष्ट्रवादी-काँग्रेससोबतची आघाडी तोडा, आजही तुमचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार – दीपक केसरकर

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam | ‘ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम’, भास्कर जाधवांचा टोला

Maharashtra Farmers March | मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंद मधून परत निघाले