Shiv Thakare | विना जगतापनंतर आता ‘रोडीज’ फेम रणविजयची शिव ठाकरेसाठी खास पोस्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हिंदी बिग बॉसच्या १६ व्या सीझनमध्ये शिव ठाकरे (Shiv Thakare) वेळोवेळी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तो त्याच्या खेळीने घरातील इतर स्पर्धकांबरोबर बाहेरच्या प्रेक्षकांचेदेखील मन जिंकत आहे. शिव हा टास्कमध्ये शांत डोकं ठेवून आणि युक्तीने खेळताना दिसत आहे. शिवने आधी मराठी बिग बॉस सीझन 2 चा विजयी खेळाडू ठरला होता, तर आता गेल्या आठवड्यात टास्कदरम्यान शिवची एक वेगळीच प्रतिमा पाहायला मिळाली. या टास्कमध्ये नंतर सोशल मीडियावर शिवला अनेक कलाकार प्रेक्षक पाठिंबा देत आहेत, तर त्यातच रोडीज फेम रणविजयनेही शिव ठाकरेसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसत आहे. (Shiv Thakare)

नुकत्याच झालेल्या एका टास्कमध्ये शिव ठाकरे भावूक झालेला दिसला. बिग बॉसने घरातील सदस्यांना आपल्या भावना व्यक्त करण्याचा एक टास्क दिला होता. यावेळी टास्कमध्ये शिव आपल्या भावना व्यक्त करताना खूपच हळवा झाला आणि रडतानाही दिसला होता. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या मित्र परिवाराकडून अनेकांनी त्याला पाठिंबा दिला. त्यातच ‘रोडीज’ फेम रणविजयने त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. (Shiv Thakare)

 

रणविजयने शिव सोबत रोडीजमध्ये काढलेला एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये म्हटले की, “एकेकाळी तू माझ्या टीममध्ये होतास. त्यावेळी आपण अनेक चढ-उतार पाहिले आहेत. तू खूपच समजूतदार आणि कष्टाळू आहेस. तू प्रत्येक अडचणीला हसत हसत सामोरे जातोस, हीच तुझ्यामधली स्पिरिट जी मला नेहमीच आवडते. प्रत्येकांना हा प्रश्न पडतो की मी तुला कसे काय ओळखतो. रोडीजमधून तुझा हा प्रवास मी स्वतः डोळ्यांनी पाहिला आहे. मी त्याला सर्वच गोष्टींसाठी शुभेच्छा देतो”.

शिव ठाकरेने बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनचे विजेतेपद जिंकण्याआधी रोडीजचे विजेतेपदही मिळवले होते.
काही दिवसांपूर्वीच शिव ठाकरेसाठी विना जगताप हिने केलेली पोस्टदेखील चर्चेत आली होती,
तर आता पुन्हा एकदा शिव ठाकरेसाठी रणविजयने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

 

Web Title :- Shiv Thakare | bigg boss 16 shiv thakare got appreciation from roadies fame ranvijay singh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Akshay Kumar | अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील लुक आला समोर; दिग्दर्शकाने केली खोचक टिप्पणी

Kirit Somaiya | ‘साई रिसॉर्टची चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा’ – किरीट सोमय्या

Pune Pimpri Crime | लग्नासाठी आणलेल्या दागिन्यांच्या बॅगेवर चोरट्यांचा डल्ला; 27 लाखांचा मुद्देमाल लंपास, बालेवाडी येथील घटना