नांदेडच्या जिल्हाधिकारी पदी शिवा शंकर यांची नियुक्ती

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी परभणीचे जिल्हाधिकारी शिवा शंकर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आज (गुरुवार) सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांच्यावतीने देण्यात आली आहे. या आदेशावर अपर सचिव सिताराम कुंटे यांची स्वाक्षरी असून हा आदेश आज जारी करण्यात आला आहे.

शिवा शंकर यांनी परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यांची बदली नांदेड येथे झाल्याने त्यांच्या जागी डी. एम. मुगळीकर यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुगळीकर यांच्या नियुक्तीमुळे पाथरी व शिर्डी हा साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद सुटण्यास होऊ शकते काय याकडे परभणीकरांचे लक्ष आहे.

अरुण डोंगरे यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना अनेक निर्णय घेतले आहेत. एक उत्तम प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे उपक्रम राबवण्यात आले होते.