लग्नानंतर नेहा धूपियाला शुभेच्छाऐवजी मिळाल्या शिव्या-शाप

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

बॉलीवूड मध्ये अभिनयाने स्वतःचे स्थान निर्माण करणारी नेहा धूपिया हिने काही दिवसांपूर्वी अंगद बेदीया याच्याशी लग्न केले आहे. नेहा धूपिया आणि अंगद बेदीया या दोघांनीही आपले लग्न ‘सीक्रेट’ ठेवले. या लग्नाबद्दल कोणालाही काहीही कळू दिले नव्हते.या कानाचे त्या कानाला कळणार नाही,हि गोष्ट कोणालाही कळणार नाही याची त्या दोघांनीही खूप काळजी घेतली होती. अलीकडे एका मुलाखतीत नेहाने आपल्या या ‘सीक्रेट वेडिंग’चा संपूर्ण प्लान शेअर केला होता. लग्नानंतर नेहाने हा पूर्ण प्लॅन तिने सोशल मीडियावर शेअर केल्याने तिला लोकांनी शुभेच्छा देण्याचे सोडून तिच्यावरच लोकांनी शिव्यांचा भडीमार केला होता. या लोकांकडून आलेल्या प्रतिक्रिया धक्कादायक होत्या. असे नेहाने यावेळी सांगितले. ‘लग्न झाल्यानंतर मी इन्स्टाग्रामवर ही बातमी शेअर केली. काही वेळानंतर मी सहज म्हणून फोन चेक केला तर इन्स्टावर जवळपास ६०० च्या आसपास मॅसेज पडले होते. हे सारे मेसेज शुभेच्छा संदेश नव्हते तर त्यात खूप साऱ्या शिव्या होत्या.लोकांचा संताप होता,असे नेहाने सांगितले.

[amazon_link asins=’B06Y66GKGN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b2314409-948e-11e8-84df-5db71de11d45′]

आम्ही केलेले ‘सीक्रेट वेडिंग’ अनेकांसाठी धक्कादायक गोष्ट होती. पण अंगद हा लग्नाआधीपासूनच नात्याबद्दल क्लीअर होता. त्याला बॉयफ्रेन्ड-गर्लफ्रेन्ड हे नाते नको होते. लग्न करा किंवा मित्र बनून राहा, असे त्याचे स्पष्ट मत होते. आम्हा दोघांनाही लग्नाचा गाजावाजा करायचा नव्हता. त्यामुळे आम्ही लग्नाची बातमी शक्य तेवढी दडवून ठेवली, असेही तिने सांगितले.

नेहा व अंगदने अचानक गुपचूप लग्न केल्याने अनेकांनी असा तर्क लावला कि, नेहा प्रेग्नंट असल्यामुळे तिने घाईघाईत लग्न उरकले. पण नेहाच्या वडिलांनी आणि अंगदने या सर्व फेक बातम्या धुडकावून लावल्या होत्या. लग्नाआधीच गरोदर झाल्यामुळं नेहानं घाईघाईनं लग्न केलं ही निव्वळ अफवा आहे. कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक नेहाचं लग्न झाल्यामुळं लोक अशा चर्चा करत आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचं काहीही तथ्य नाही,’ असा खुलासा खुद्द अभिनेत्री नेहा धुपियाचे वडील प्रदीप धुपिया यांनी केला होता. ज्येष्ठ क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांचा मुलगा म्हणजेच अंगद बेदी याने क्रिकेट विश्वात स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिल्लीच्या रणजी संघाकडून सुरुवातीला काही वर्ष क्रिकेट खेळणाऱ्या अंगदने त्यानंतर मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. रेमो डिसूझा दिग्दर्शित ‘फालतू’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याशिवाय ‘उंगली’, ‘पिंक’, ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांतूनही तो झळकला होता.

[amazon_link asins=’B075MHBDN4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c0d4d29c-948e-11e8-9b16-7d5392ea4822′]