निफाड पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी शिवा सुरासे यांची निवड

लासलगांव – निफाड पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी शिवसेनेचे शिवा सुरासे निवड करण्यात आली आहे.निफाड पं स सभापती अनुसयाबाई जगताप या रजेवर गेल्याने प्रभारी सभापती म्हणून सुरासे यांची निवड करण्यात आली आहे

आपल्या धडाकेबाज कामासाठी शिवा सुरासे हे संपूर्ण तालुक्यामध्ये ओळखले जातात.उपसभापती पदाचा कार्यभार हातात घेताच निफाड पंचायत समितीच्या कार्यालयातील तब्बल 31 कर्मचारी हे उशिराने कामावर दाखल झाले होते. या सर्व कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी मार्गाने उपसभापती शिवा सुरासे यांनी सत्कार केला व यांच्या एक दिवस पगाराची कपातीची कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

या निवडीबद्दल कृषिमंत्री दादाजी भुसे ,जि प अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर,आमदार नरेंद्र दराडे ,आ सुहास कांदे, भाऊसाहेब चौधरी ,माजी आमदार अनिल कदम ,माजी आमदार कल्याणराव पाटील, जिल्हाप्रमुख सुनील पाटील ,उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जगताप ,माजी पं स सभापती राजेश पाटील,पंडितराव आहेर ,सोमनाथ पानगव्हाणे, कोमल राजोळे, अनुसया जगताप ,गुरूदेव कांदे ,संभाजी पवार ,तालुका प्रमुख सुधीर कराड,प्रकाश पाटील यांनी या निवडीचे अभिनंदन केले आहे