छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त नतमस्तक झाले बॉलिवूड; अमिताभ बच्चन, अजय देवगन, रितेश देशमुख आणि अनिल कपूर झाले ‘नतमस्तक’

पोलीसनामा ऑनलाईन : देशातील सर्वात महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर मराठीत एक नोट लिहिली आहे. अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे की, ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच हार्दिक शुभेच्छा. 19 फेब्रुवारी जयंती’ . तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोही शेअर केला आहे.

 

 

 

 

चित्रपट अभिनेता रितेश देशमुखने देखील छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले आहे आणि चाहत्यांना जयंतीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले की, ‘अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आणि स्फुर्तिस्थान छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मनाचा मुजरा. शिवजयंतीच्या खास शुभेच्छा’ रितेश देशमुखने शिवाजी महाराजांचे राजधानी रायगडचे फोटोही शेअर केली आहेत. एका फोटोमध्ये तो शिवाजी महाराजांच्या चरणी डोके टेकताना दिसत आहेत.

 

 

 

 

अजय देवगणने आपल्या प्रसिद्ध ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा एक डायलॉग लिहून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले आहे.त्याने लिहिले, ‘हर मराठा पागल है स्वराज का, शिवाजी राजे का, भगवे काl शिवाजी जयंती की शुभकामनाएंl’ त्यासोबतच अनिल कपूरने देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.त्यांनी लिहिले की, ‘नेहमीच एक महान प्रशंसक मी लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांची उपासना करत आहे. ते माझ्यासाठी प्रेरणास्रोत आहेत. जयंतीनिमित्त महान योद्धाला श्रद्धांजली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनाच एक फोटो देखील शेअर केला आहे. चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीबद्दल शुभेच्छा दिल्या आहे.

 

 

 

 

छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत. देश-विदेशात त्यांच्याबद्दल खूप श्रद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरही बरेच चित्रपट देखील बनवले गेले आहेत. नुकताच चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी म्हणाला की, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर एक चित्रपट बनवायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक कलाकारांची श्रद्धा आहे.