भाजप ‘आमदारा’ने छत्रपती शिवाजी महारांजांची तुलना केली ‘या’ ग्रीक राजाशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशात आणि महाराष्ट्रात ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून वादंग उठले असताना भाजप नेते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यावर नाव न घेता टीका केली. त्यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी उदयनराजे यांचे नाव न घेता त्यांना लक्ष्य केले आहे.शिवसेना आणि राष्ट्रवादी कडून उदयनराजे भोसले यांना लक्ष्य केले जात असतानाच आमदार नितेश राणे यांनी शिवाजी महाराज यांची तुलना पोर्तुगीज राजाशी केली आहे.

https://twitter.com/NiteshNRane/status/1217127354839044100

उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाणता राजा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे जाणता राजा उपमा देताना विचार करावा अशी टीका शरद पवार यांचे नाव न घेता केली होती. तसेच, अनेकांना जाणता राजा उपमा देतात. त्याचाही मी निषेध करतो, असे उदयनराजे म्हणाले होते. आता भाजपचे कणकवली मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना जगजेत्ता अलेक्झांडरशी केली आहे.

नितेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, या शिवाजीराजांचे शौर्य आणि कर्तृत्व एवढे मोठे आहे की, त्यांची तुलना जगज्येत्त्या अलेक्झांडरशीच होऊ शकेल. असा आशयाचा एक फोटो त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. यावरून, छत्रपती शिवाजी महाराज हे जगजेत्ता असल्याचे नितेश राणेंनी सुचवलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/